Breaking
जळगावधुळेनंदुरबारब्रेकिंगमहाराष्ट्र

दोन लाखांची लाचेची मागणी भोवली; गट शिक्षण अधिकाऱ्याला धुळे एसीबी कडून अटक.

0 5 3 3 8 6

उपसंपादक – कल्पेश महाले 

धुळे – तक्रारदार यांचे ओम साई इन्टरप्राइझेस या नावाचे पिंपळनेर, ता. साक्री जि. धुळे येथे दुकान आहे. सदर फर्म मार्फत तक्रारदार यांनी समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत बुट व पायमोजे पुरवठा करणे बाबत जिल्हा परिषद शाळांमार्फत प्राप्त पुरवठा आदेशानुसार साकी तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांना अंदाजे एकुण चाळीस लाख (४०,००,००० /-) रूपयांच्या बुट व पायमोजे ह्या वस्तु पुरवठा केल्या होत्या.

सदर अनुदान मागणीच्या फाईल जमा करून मला सदर वस्तुंचे बिल मला अदा करणे लोकसेवक महेंद्र गोपाळराव सोनवणे, गट शिक्षण अधिकारी, पंचायत समिती, सांकी, जि. धुळे तथा अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (प्राथमिक व माध्यमिक), धुळे यांनी बुट व पायमोजे हया वस्तुंच्या बिल मागणीचे फाईल जमा करून अंदाजे एकुण चाळीस लाख (४०,००,०००/-) रूपये बिलाच्या ०५ टक्क्या प्रमाणे दोन लाख (२,००,०००/-) रूपये लाचेची मागणी केल्याची तक्रारदार यांनी दि. ३०.०९.२०२४ रोजी तक्रार केली होती.

सदर तकारीची दि.३०.०९.२०२४ रोजी व दि.०१.१०.२०२४ रोजी पडताळणी केली असता गट शिक्षण अधिकारी, महेंद्र सोनवणे यांनी तक्रारदार यांचेकडे बुट व पायमोजे हया वस्तुंचे अंदाजे एकुण ४०,००,०००/- रूपये बिलाच्या ०५ टक्क्या प्रमाणे २,००,०००/- रूपये लाचेची मागणी केली म्हणुन त्यांचे विरुध्द धुळे शहर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ व ७–अ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. सदर आरोपीस सेवानिवृत्ती ला फक्त सात दिवस बाकी आहेत ते दि. ३१/१०/२०२४ रोजी सेवानिवृत्त होणार होते.

ला.प्र. विभाग धुळे पथकाने या अगोदर राकेश साळुंके, शिक्षणाधिकारी(प्राथमिक), जि.प.धुळे तसेच श्रीमती मीनाक्षी गिरी, अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (प्राथमिक), धुळे यांच्यावर सापळा कारवाई केली असून धुळे जिल्ह्याच्या शिक्षण विभागातील ही तिसरी कारवाई आहे. या कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्याभरात व आजूबाजूच्या जिल्ह्यात सर्व शासकीय विभागांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक श्री.सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी तसेच राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रविण मोरे, रामदास बारेला, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रविण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिंबधक विभाग, नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आली असुन गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.

4/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 3 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे