खेडगाव येथे शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या.
खेडगाव प्रतिनिधी कलीम सय्यद.
चाळीसगाव तालुक्यातील खेडगाव येथे एका शेतकऱ्याने डोईवर वाढत असलेल्या कर्जामुळे, व कापूस व्यापाऱ्याच्या फ्रोड पणा मुळे, स्वतःच्या शेतातील शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली.
सविस्तर वृत्त असे की, ललित विनायक साळुंके हे आपल्या परिवारासह खेडगाव येथे राहत होते. अस्मानी संकटाला तोंड देऊन सुद्धा, त्यांनी शेतात राबून चांगला कापूस पिकवला होता. मात्र कापसाला भाव नसल्याने, डोईवर असलेल्या कर्जाचे विचार हे शेतकरी ललित सोळुंके यांच्या मनात येतच होते.
दरवर्षी प्रमाणे यंदा कापूस पिकात मोठी घट, त्यातच कापसाला नसलेला भाव, आणि डोईवर असलेले मा.विकास सोसायटी खेडगाव, सहित इतर कर्ज या सर्व संकटाला तोंड देत असताना, चार महिन्या अगोदर खेडगाव मधील एका कापूस खरेदी व्यापाऱ्याला दोन लाख चौदा हजार रु ( २१४००० ) किंमतीचा कापूस दिला होता. मात्र त्याच कापूस खरेदी व्यापाऱ्याने पैसा न दिल्याने, व देणारही नाही जे करायचे ते करून घे अशी अरेरावी ची भाषा केल्याने, त्याच चिंतेने शेतकरी ललित सोळुंके यांनी स्वतःच्या शेतातील शेडमध्ये शनिवारी सकाळी ८ ते ९ दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवल्याची चर्चा खेडगावसह परिसरात सुरू आहे.
मयत शेतकरी ललित सोळुंके पच्यात त्यांच्या परिवारात आई, लहान भाऊ, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.
शेतकऱ्याचे कापासाचे पैसे घेऊन फरार झालेला कापूस व्यापाऱ्यावर कारवाई होणार का ?
आपल्या शेतीत राब राब राबून आपल्या लहान लेकरू सारखे पिकांना मोठे करणे, त्यात अस्मानी संकट, या सर्वांना तोंड देऊन त्यातून माल काढणे, आणि त्याला बाजारात विकणे, परंतु सरकारच्या सी.सी.आय च्या मनमानी कारभार ला आणि कापसाला हमीभाव पेक्षा कमी भाव मिळत असल्याने, शेतकऱ्याला खाजगी व्यापाऱ्याला कापूस दयावा लागत आहे.
त्यामुळेच खेडगाव येथील, कापूस व्यापारी पंडित वाणी यांना १५ ते २० शेतकऱ्यांनी कापूस दिलेला आहे. त्यातून बऱ्याच शेतकऱ्यांचे लाखो रुपये, व्यापारी पंडित वाणी यांनी दिलेले नसल्याचे मयत ललित चे भाऊ आबा विनायक साळुंके यांनी सांगितले. आपल्या पत्नीचे बायपास करायचे, सोसायटीचे कर्ज भरायचे, घर कसे चालवायचे ? या विचार येत असताना, कापूस दिलेल्या पंडित वाणी यांना वारंवार पैशाची मागणी करून सुद्धा पैसे मिळत नव्हते, त्यातच कापूस व्यापारी हा गाव सोडून बाहेरगावी गेला, मयत ललित ने धीर सोडत नाईलाजास्तव आत्महत्या केली असे मयत ललित चे भाऊ आबा विनायक साळुंके यांनी सांगितले.
मयत ललित सोळुंकेच नाही तर अजून १५ ते २० शेतकऱ्यांचे कापसाचे पैसे सबंधित कापूस व्यापारी यांचेकडे असल्याचे कळत आहे. त्यातील एका शेतकऱ्याने काही दिवसाच्या अगोदर मेहूनबारे पोलीस स्टेशन ला तक्रार केली. होती परंतु कोणत्याही प्रकारची कारवाई सबंधित कापूस व्यापारी यावर न झाल्याने शेतकरी वर्गाने नाराजी दाखवली आहे.