Breaking
ब्रेकिंग

मतदार यादी पुनर्निरीक्षणात मालखेडे गावाचा 100% टप्पा पूर्ण; बिलओ सौ. क्रांती साळुंखे मॅडम यांचा जळगाव जिल्हाधिकाऱ्यांकडून गौरव…!

मतदार यादी पुनर्निरीक्षणात मालखेडे गावाचा 100% टप्पा पूर्ण; बिलओ सौ. क्रांती साळुंखे मॅडम यांचा जळगाव जिल्हाधिकाऱ्यांकडून गौरव...!

1 0 6 0 7 6

उपसंपादक :-इमरान शेख

मतदार यादीचा सखोल पुर्ननिरीक्षण कार्यक्रम 2026 अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी करून _मालखेडे_ गावाने दिलेले उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण केले आहे. या कामगिरीबद्दल गावातील बिलओ सौ. क्रांती साळुंखे मॅडम यांना जळगाव जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

घरोघरी जाऊन माहिती संकलन, नावे नोंदणी, दुरुस्ती आणि वगळण्याची प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे पूर्ण केल्यामुळे मालखेडे गाव जिल्ह्यात आदर्श ठरले आहे.

बिलओ मॅडम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि गावकऱ्यांच्या सहकार्यामुळेच हे उद्दिष्ट वेळेत साध्य झाले.

मालखेडे येथे SIR ची गावकऱ्यांना माहिती देतांना व जनजागृती करताना (पोलीस पाटील )श्री किशोर पाटिल सर व या कामासाठी माजी सरपंच ईश्वर पाटील,उपसरपंच दिपक पाटील,रोजगरसेवक समाधान देशमुख व गावकऱ्यांचे सहकार्य लाभले.

या सन्मानाबद्दल गावकऱ्यांनी बिलओ सौ. क्रांती साळुंखे मॅडम व पोलीस पाटील श्री किशोर पाटिल यांचे मनापासून अभिनंदन केले असून त्यांच्या कार्याचे कौतुक केले. गावाच्या प्रगतीत अशा समर्पित कर्मचाऱ्यांच्या योगदान महत्त्वाचे असल्याची भावना यावेळी गावकऱ्यांच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 0 6 0 7 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे