Breaking
गुन्हेगारीछत्रपती संभाजीनगरजळगावधुळेनंदुरबारनाशिकब्रेकिंगमहाराष्ट्र

चाळीसगाव वनविभागाच्या पथकाने पाठलाग करुन पकडलेला गाडीमध्ये सापडले पाच मृत हरिण.

0 7 7 7 1 3

उपसंपादक – कल्पेश महाले

चाळीसगाव – जंगलातील हरणांचे शिकार करुन त्यांच्या मांसची विक्री करीत असल्याची गुप्त माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे यांना मिळाली होती. त्यानुसार आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी ३० एप्रिलच्या पहाटे चार वाजेच्या सुमारास बिलाखेड गावाजवळ सापळा रचला असता छत्रपती संभाजीनगर कडून येणारी एम.एच.४१ सी.९६९१ ही गाडी सुसाट वेगाने येतांना पथकाला दिसली असता म्हणून त्यांनी हात देऊन चालकाला गाडी थांबवन्याचा प्रयत्न केला असता त्याने इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत गाडी वेगाने पुढे नेली. त्यामुळे वनविभागाच्या पथकाने सदर गाडीचा पाठलाग सुरु केला असता धुळे शहराजवळ वाहन चालकाने गाडी थांबविली आणि त्याच्यासह गाडीत असलेल्या पाच इसम गाडीच्या खाली उतरुन फरार झाले आहेत.

यावेळी वनविभागाच्या पथकाने गाडीची तपासणी केली असता सदर गाडीमध्ये पाच हरिण मृत अवस्थेत आढळून आले  त्यामध्ये दोन नर व तीन मादींचा समावेश असून या हरणांचे पोट फाडलेले होते व पोटातील घाण बाहेर काढून फेकलेली होती याचा अर्थ त्यांची शिकार करण्यात आली असल्याचे वनविभागाच्या लक्षात आले असता वनविभागाने मृत अवस्थेतील हरिण व इनोव्हा गाडी ताब्यात घेतली व या हरिणांची बेकायदेशीर शिकार व तस्करी करणाऱ्या फरार शिकाऱ्यांचा वनविभागाने शोध सुरू केला आहे.

ही कारवाई उपवनसंरक्षक प्रवीण ए, सहाय्यक वनसंरक्षक उमेश बिरासदार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे यांच्यासह चंद्रशेखर पाटील, ललित पाटील, अजय महिरे, काळू पवार, रवींद्र पवार, भटू अहिरे, संजय गायकवाड, समाधान मराठे यांनी केली.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 7 7 1 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे