Breaking
ब्रेकिंग

बाहाळ चाळीसगाव तालुक्यातील येथे रुर्बन मिशनचा गैरवापर; ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराविरोधात प्रभाकर महाजन यांचे १ मे पासून आमरण उपोषण..!

बाहाळ चाळीसगाव तालुक्यातील येथे रुर्बन मिशनचा गैरवापर; ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराविरोधात प्रभाकर महाजन यांचे १ मे पासून आमरण उपोषण..!

0 9 7 3 2 2

जिल्हा प्रतिनिधी :- कलिम सैय्यद

चाळीसगाव तालुक्यातील बाहाळ, येथे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी रुर्बन मिशन योजनेचा बाहाळ ग्रामपंचायतीने गैरवापर केल्याचा आरोप करत येथील सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर वना महाजन यांनी १ मे पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

नेमका आरोप काय?

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी रुर्बन मिशन अंतर्गत गावात शहरासारख्या १४ मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी लाखो रुपयाचा निधी मंजूर झाला होता. मात्र, बाहाळ ग्रामपंचायतीने या निधीचा भोंगळ कारभार करत गैरवापर केला आहे, असा आरोप प्रभाकर महाजन यांनी केला आहे..

उपोषणकर्त्यांचे प्रमुख प्रश्न..

1.  रुर्बन मिशन अंतर्गत बाहाळ गावासाठी किती निधी आला व तो कोणत्या कामांवर खर्च झाला? कामांचे बिल, मोजमाप पुस्तिका दाखवा.

2.  24 तास पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, रस्ते, पथदिवे यापैकी कागदावर पूर्ण दाखवलेली कामे प्रत्यक्षात कुठे आहेत?

3.  मंजूर कामांचे टेंडर

दर्जा तपासणी अहवाल कुठे आहे?

4.  ग्रामसभेला विश्वासात न घेता ठराव मंजूर करून निधी वळवला का?

प्रभाकर महाजन यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “गावाच्या विकासासाठी आलेला पैसा गावकऱ्यांपर्यंत पोहोचलाच नाही. कागदोपत्री कामे दाखवून लाखो रुपये हडप केले आहेत. जोपर्यंत या योजनेची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण मागे घेणार नाही.”

या उपोषणाला ग्रामस्थांचा पाठिंबा वाढत असून, चाळीसगाव तालुक्यातील विविध संघटनांनीही पाठिंबा दर्शवला आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन चौकशी समिती नेमावी, अशी मागणी होत आहे…!

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 7 3 2 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे