चाळीसगांव शहरातील कर्तव्यावर असलेले मतदान अधिकारी संजय भगवान चौधरी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
चाळीसगांव शहरातील कर्तव्यावर असलेले मतदान अधिकारी संजय भगवान चौधरी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगांव – शहरातील घाट रोड परिसरातील मतदान केंद्र क्रमांक १९१, तहजीब उर्दू प्रायमरी स्कुल येथे कर्तव्यावर असलेले मतदान अधिकारी संजय भगवान चौधरी वय – ५५ , रा. जोशी पेठ पांझरापोळ टाकीजवळ,महाले प्रोव्हिजन च्या बाजूला जळगांव जि.जळगांव यांना १३ मे २०२४ रोजी पहाटे २ ते ३ वाजेदरम्यान छातीत त्रास होऊ लागल्याने ग्रामीण रुग्णालय चाळीसगांव येथे उपचार कामी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना तपासून मयत घोषीत केले. त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे सांगितले.
यावेळी सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंग देशमुख, पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर ढिकले, सहाय्यक फौजदार सुभाष पाटील यांनी घटनास्थळी आणि ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव येथे भेट दिली. सदरील पंचनामा पोलीस नाईक किशोर पाटील,पोलीस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय महाजन यांनी केला.