Breaking
ब्रेकिंग

15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी निमित्त खेडगावमध्ये शहीद जवान अमोल साळुंखे यांना मानवंदना देशभक्तीच्या भावनेने गाव भारावले…!

15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी निमित्त खेडगावमध्ये शहीद जवान अमोल साळुंखे यांना मानवंदना देशभक्तीच्या भावनेने गाव भारावले...!

1 0 8 8 0 9

जिल्हा प्रतिनिधी:-कलीम सैय्यद

चाळीसगाव तालुक्यातील मोठे खेडगाव येथे दिनांक : 15ऑगस्ट शनिवार रोजी देशाचा 80 वा स्वातंत्र्यदिन निमित्त देशभक्तीच्या आणि अभिमानाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी गावचे सुपुत्र आणि कर्तव्य बजावताना फाल्गुन येथे शहीद झालेले जवान अमोल साळुंखे यांना गावकऱ्यांनी भावपूर्ण मानवंदना दिली.

खेडगावच्या सरपंच सौ. उषाताई मरसाळे आणि उपसरपंच श्री. योगेश मोहन चौधरीशहीद जवान अमोल साळुंखे यांच्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून मानवंदना देण्यात आली.

यावेळी सरपंच उषाताई मरसाळे म्हणाल्या, “शहीद अमोल साळुंखे हे आपल्या गावाचे भूषण आहेत. त्यांनी देशासाठी दिलेल्या बलिदानामुळे आज आपण स्वातंत्र्याचा श्वास घेत आहोत. त्यांचे कुटुंब आणि त्यांचे बलिदान हे आपल्यासाठी कायम प्रेरणादायी राहील.”

उपसरपंच योगेश चौधरी यांनी सांगितले की, “देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांमुळेच आपण सुरक्षित आहोत. शहीदांच्या स्मरणार्थ गावात दरवर्षी रक्तदान शिबिर आणि वृक्षारोपणाचा उपक्रम राबवला जाईल.”

या कार्यक्रमाला *गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच खेडगाव माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी देखील मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते आणि भाषणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली

देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद जवान अमोल साळुंखे यांचे नाव खेडगावच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल, असा विश्वास यावेळी सर्वांनी व्यक्त केला..

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 0 8 8 0 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे