पारोळ्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरचे आमदार अमोलदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन..!
पारोळ्यात 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरचे आमदार अमोलदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन..!

इमरान शेख उपसंपादक
पारोळा शहर ला , दि.०८ ऑगस्ट रोजी महसूल विभागाच्या सेवा अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासन महसूल व वनविभागाच्या निर्देशानुसार आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ चे उद्घाटन आज एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड. अमोलदादा चिमणरावजी पाटील यांच्या शुभहस्ते पारोळा येथे करण्यात आले.
मुख्यमंत्री महोदयांच्या जन्मदिवसानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शासनाच्या विविध योजनांचा व महसूल विभागाशी संबंधित सेवांचा लाभ तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
सेवा नागरिकांपर्यंत पोहोचली पाहिजे’ आमदार अमोलदादा पाटील कार्यक्रमाला संबोधित करताना आमदार ॲड. अमोलदादा पाटील म्हणाले, महसूल विभाग हा सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट जोडलेला आहे. जमिनीच्या नोंदी, फेरफार, विविध दाखले, महसूल विषयक प्रकरणे तसेच शासनाच्या योजनांचा लाभ घेताना नागरिकांना अनावश्यक अडचणी येऊ नयेत, यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम केले पाहिजे.”_
शासनाच्या योजना केवळ कागदावर न राहता त्याचा प्रत्यक्ष लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे हीच खरी लोकसेवा आहे. नागरिकांना वारंवार कार्यालयात हेलपाटे मारण्याची वेळ येऊ नये. त्यांचे प्रश्न एकाच ठिकाणी ऐकून घेऊन त्यावर तत्काळ कार्यवाही झाली पाहिजे,”_ असे आवाहन त्यांनी केले.
महसूल समाधान शिबिराच्या माध्यमातून नागरिकांच्या विविध महसूलविषयक अडचणी, प्रलंबित प्रकरणे व आवश्यक सेवांबाबत मार्गदर्शन मिळेल. त्यामुळे नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
अधिकारी-कर्मचाऱ्यांना तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
यावेळी उपस्थित महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना आमदारांनी नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या अर्जांवर व तक्रारींवर वेळेत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. शासनाच्या विविध सेवा-सुविधांची माहिती नागरिकांना सुलभ भाषेत देऊन पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यावर भर देण्याचे सांगितले.
कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती या उद्घाटनप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख प्रा. मनोजभाऊ पाटील, जिल्हा समन्वयक जगदीशदादा पाटील, उपजिल्हाप्रमुख मनिषभाऊ पाटील, जि.प.मा.उपाध्यक्ष ज्ञानेश्वरनाना आमले, मुद्रांक जिल्हाधिकारी मंदारजी कुलकर्णी, एरंडोलचे उपविभागीय अधिकारी मनिषकुमार गायकवाड, तहसिलदार डॉ.उल्हासजी देवरे, तहसिलदार गोपाल पाटील, मुख्याधिकारी तुषारजी देवरे, नगराध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, डॉ.नरेंद्र ठाकूर* यांच्यासह शिवसेना-भाजपा महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध शासकीय विभागांचे अधिकारी-कर्मचारी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत प्रशासन अधिक संवेदनशील, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्याच्या दिशेने हे शिबिर एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे.


