कासोदा ग्रामपंचायतीत स्वच्छ भारत मिशनची फज्जा: लाखो रुपयांच्या ई-रिक्षा धूळ खात, प्रशासनाचा निष्काळजीपणा..!
कासोदा ग्रामपंचायतीत स्वच्छ भारत मिशनची फज्जा: लाखो रुपयांच्या ई-रिक्षा धूळ खात, प्रशासनाचा निष्काळजीपणा..!

कासोदा :-एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे केंद्र आणि राज्य शासनाच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण भागात घनकचरा व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायतींना लाखो रुपये खर्च करून ई-रिक्षा कचरा संकलन वाहने
पुरवण्यात आल्या. मात्र, कासोदा ग्रामपंचायतीमध्ये प्रशासनाच्या अनास्थेमुळे आणि नियोजनाच्या अभावामुळे ही ई-रिक्षा खरेदी केल्यापासून ग्रामपंचायत आवारातच धूळ खात उभी आहे. लाखो रुपयांचा निधी खर्च करूनही ग्रामस्थांना याचा कोणताही लाभ मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
काय आहे प्रकरण?
गावातील कचरा घरोघरी जाऊन संकलित करण्यासाठी आणि ओला-सुका कचरा वेगळा करण्यासाठी या ई-रिक्षा देण्यात आल्या होत्या. या ई-रिक्षाची किंमत साधारणतः लाख रुपये इतकी आहे. ग्रामीण भागात कचऱ्याची समस्या मिटावी हा यामागचा मुख्य उद्देश होता.धूळ खात उभी रिक्षा, जबाबदार कोण?
एकीकडे गावात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचलेले दिसत असताना, दुसरीकडे ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात ही ई-रिक्षा गेल्या किती वर्ष पासून उभी आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षा चालवण्यासाठी कर्मचारी नसणे, बॅटरी चार्जिंगची सोय नसणे, किंवा काही तांत्रिक अडचणींमुळे ही गाडी बंद अवस्थेत आहे.
ग्रामस्थांचा आरोप:गावच्या सरपंचांनी आणि ग्रामसेवकाने या वाहनांच्या देखभालीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. शासनाचा लाखो रुपयांचा निधी अशा प्रकारे पाण्यात जात असताना, यावर कोणतीही कारवाई होत नाही. गावातील स्वच्छता मोहीम कागदावरच राहिली असून, प्रत्यक्ष पाहणीत स्वच्छतेची बोंब आहे, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे.तातडीने दुरुस्तीची गरज:ही ई-रिक्षा तात्काळ चालकाची नियुक्ती करून कचरा संकलन सुरू न केल्यास ग्रामस्थांकडून तीव्र नाराजगी वक्त करण्यात अळी आहे एका बाजूला स्वच्छतेचा गाजावाजा आणि दुसऱ्या बाजूला अशी स्थिती, यामुळे ग्रामीण भागात स्वच्छ भारत मिशनच्या अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे…!



