Breaking
जळगावधुळेनंदुरबारनाशिकब्रेकिंगमहाराष्ट्र

कन्नड घाटातील ३०० फूट दरीत कोसळली कार; एक जण जागीच ठार तर तिघे गंभीर जखमी

0 7 5 0 2 3

उपसंपादक – कल्पेश महाले 

मल्हार पॉइंटजवळ कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने झाला भीषण अपघात

चाळीसगांव – कन्नड घाटात अवघड वळणावर कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार ३०० फुट दरीत कोसळली. यात कारमधील एकाचा जागीच मृत्यू तर अन्य तिघे जण गंभीर जखमी झाले. कन्नड घाटातील जय मल्हार पॉईंटजवळ सायकांळी ५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीसांनी धाव घेत अथक प्रयत्न करून तिघे जखमींना व मृतदेहाला वर काढले. मुकेश राजेंद्र महाजन (३६) रा.ओंकार कॉलनी, कल्पतरु अपार्टमेंट, नाशिक असे मृताचे नाव आहे. चाळीसगाव येथील विजय महाजन व जितेंद्र महाजन हे आपले नाशिक येथील नातेवाईक मुकेश महाजन ( वय ३६) व दिपक बोंडाळे रा. नाशिक मारुती सुझुकी कंपनीची बलेनो कार क्र. एम.एच.१९ डी.व्ही. ९२८९ ने कन्नडकडून चाळीसगावकडे येत होते. तेव्हा कन्नड घाटातील जय मल्हार पॉइंट जवळील वळणावर कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या बाजूला उतरून थेट ३०० फुट दरीत कोसळली. यात विजय महाजन यांचे दाजी मुकेश महाजन हे जागीच ठार झाले. तर कारमधील इतर तिघे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर तेथून जाणाऱ्या अन्य वाहन चालकांच्या लक्षात ही घटना आली असता त्यांनी तातडीने ही माहिती महामार्ग पोलीसांना व चाळीसगाव ग्रामीण पोलीसांना दिली. माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पाटील व अन्य पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

घाटातील अवघड वळणावर  नियंत्रण सुटले; दोर व क्रेनच्या साहाय्याने वर काढले 

जखमींची मदत करताना पोलीस

३०० फूट खोल दरीत जखमी असताना महामार्ग पोलीसांनी अथक प्रयत्न करत दोर व क्रेनच्या सहाय्याने तासाभरातच सर्वांना बाहेर काढत उपचारासाठी हलविले. सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पाटील, उपनिरिक्षक शशिकांत पाटील, पोलीस हवालदार महेंद्र अहिरराव, संदीप जगताप, योगेश पवार, अमीर तडवी, सतीष हळनोर, संदीप पाटील यांनी मदत कार्य करत जखमींना बाहेर काढले. चाळीसगाव ग्रामीण रुग्णालय चे वैद्यकीय अधिक्षक डॉ.मंदार करंबेळकर यांनी शवविच्छेदन केले.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 5 0 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे