उपसंपादक – कल्पेश महाले
पारोळा – तालुक्यातील तक्रारदार पुरुष,वय-33 रा. सावखेडा तुर्क ता.पारोळा जि.जळगांव यातील तक्रारदार यांनी दलीत वस्ती सुधार योजने अंतर्गत पारोळा तालुक्यातील सावखेडा होळ गावी पेव्हर ब्लॉक बसविणे व काँक्रिट रस्ता बनवण्याचे 7 लाखांचे व सावखेडा तुर्क गावातील रस्त्यांचे खडीकरण करण्याचे 60 लाखांचे 3 कामे व शासनाच्या 90-10 हेडखाली 30 लाखांचे 3 अशी एकूण 90 लाखाचे 6 कामे घेतली होती. त्यापैकी सावखेडा होळ गावात केलेल्या कामांचे उर्वरित पैशाचे बिल व सावखेडा तुर्क गावात घेतलेल्या कामांची वर्क ऑर्डर काढून देण्याचे मोबदल्यात आरोपी क्र 1 यांनी फिर्यादीकडे 2 लाख रुपये लाच रकमेची मागणी केली होती. त्यावेळी आरोपी क्र.2 यांनी फिर्यादीस 2 लाख रुपये लाच रकमेपैकी 50 टक्के प्रमाणे 1 लाख रुपये लाच रक्कम ऍडजस्ट करून सदर लाच रक्कम आरोपी क्र.1 यांना देण्यास प्रोत्साहन देवुन आरोपी क्र. 1 यांचे लाच मागणीस समर्थन दिले.
तसेच आरोपी क्र. 3 ते 5 यांनी सुद्धा फिर्यादी कडे स्वतः साठी व आरोपी क्र.1 यांचे लाच मागणी प्रमाणे त्यांचे करिता 2 टक्के प्रमाने 2 लाख रुपये लाच रक्कम देण्यास प्रोत्साहन दिले म्हणून त्यांच्या विरुद्ध पारोळा पोलीस स्टेशन जि.जळगांव येथे लाच मागणी बाबत गुन्हा दाखल केला आहे .
आरोपी क्र. 1)किशोर दत्ताजीराव शिंदे, वय 56वर्ष,व्यवसाय नोकरी, गट विकास अधिकारी, पंचायत समिती,पारोळा जि. जळगांव, ह.मु.मानराज पार्क,जळगाव (खाते-जिल्हा परिषद विभाग-वर्ग-1)
आरोपी क्र. 2)सुनील अमृत पाटील, वय 58वर्षे , व्यवसाय नोकरी, विस्तार अधिकारी,पंचायत समिती, पारोळा, रा.मुक्ताई नगर, जळगाव
आरोपी क्र. 3)गणेश प्रभाकर पाटील, वय 50 वर्ष, व्यवसाय नोकरी, विस्तार अधिकारी,पंचायत समिती,पारोळा, रा.मानसिंगका नगर, पाचोरा, जि.जळगाव
आरोपी क्र. 4)अतुल पंढरीनाथ पाटील, वय 37 वर्ष, व्यवसाय नोकरी, वरिष्ठ लिपिक,पंचायत समिती,पारोळा,रा. मोंढाळे प्र.अ.ता.पारोळा, जि.जळगाव
आरोपी क्र. 5)योगेश साहेबराव पाटील, वय 37 वर्ष व्यवसाय नोकरी, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, (कंत्राटी) पंचायत समिती,पारोळा, रा.गुलमोहर बाग,पारोळा
वरील लाचखोरांनी तक्रारदारकडे रक्कम – 2,00,000/ लाख रुपये लाचेची मागणी दिनांक दि.29/8/2024, दि.03/09/2024, दि.09/09/2024 यावेळी पारोळा पंचायत समिती कार्यालयात केली होती.
सदरील कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती कार्यालयांमधील लाचखोर अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
सदरील कारवाई शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक अधिकारी श्री. योगेश ठाकूर पोलीस उपअधीक्षक लाप्रवि जळगांव, सापळा व तपास अधिकारी स्मिता नवघरे पोलीस निरीक्षक लाप्रवि जळगांव, सापळा पथकातील पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, पो.कॉ. राकेश दुसाने, पो.कॉ. अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने केली.