Breaking
ब्रेकिंग

मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना – एरंडोल मतदारसंघात विकासकामांचा शुभारंभ.आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांचे हस्ते…!

मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना - एरंडोल मतदारसंघात विकासकामांचा शुभारंभ.आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांचे हस्ते...!

1 1 3 6 0 6

इमरान शेख उपसंपादक

सत्यकाम न्यूज डिजिटल मीडिया नेटवर्क

एरंडोल -मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेच्या माध्यमातून एरंडोल विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची असलेली शेत/पाणंद रस्त्यांची कामे अखेर मार्गी लागली असून, आज त्यांचा भूमिपूजन सोहळा पार पडला.

आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे पारोळा आणि भडगाव तालुक्यातील अनेक गावांतील रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे. या रस्त्यांमुळे शेतकऱ्यांना शेतात यंत्रसामग्री, खते, बियाणे नेणे-आणणे सोपे होणार असून, पावसाळ्यातील गैरसोय कायमची संपणार आहे.

पारोळा तालुका: करंजी बु., पिंप्री प्र. उ., उंदीरखेडे, बाभुळटे, वाघरे

भडगाव तालुका: गिरड, भातखंडे

या सर्व गावांमध्ये एकाच दिवशी भूमिपूजन कार्यक्रम घेण्यात आले.

या कार्यक्रमास एरंडोल प्रांताधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्री. मनीषकुमार गायकवाड. तहसीलदार डॉ. उल्हास देवरे, गटविकास अधिकारी भूषण कदम यांच्यासह महसूल, पंचायत समिती व कृषी विभागाचे अधिकारी, सरपंच, लोकप्रतिनिधी आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेती आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी हे पाऊल मैलाचा दगड ठरेल, अशी प्रतिक्रिया उपस्थित शेतकऱ्यांनी दिली…

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 1 3 6 0 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे