Breaking
ब्रेकिंग

कासोदा येथे SIR फॉर्म नोंदणी अंतिम टप्प्यात; महसूल प्रशासनाची धडाकेबाज कामगिरी…!

कासोदा येथे SIR फॉर्म नोंदणी अंतिम टप्प्यात; महसूल प्रशासनाची धडाकेबाज कामगिरी...!

1 0 4 3 4 8

प्रतिनिधी/ नुरुद्दीन मुल्लाजी

भारत निवडणूक आयोगाच्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत कासोदा ब्लॉकमध्ये SIR फॉर्म नोंदणीचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून महसूल प्रशासनाच्या प्रभावी नियोजनामुळे कामाला वेग आला आहे. बूथ लेव्हल अधिकारी (BLO) यांच्या माध्यमातून प्रत्येक पात्र मतदाराची माहिती अचूकपणे नोंदविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

सदर कामकाज उपविभागीय अधिकारी मनीष गायकवाड व तहसीलदार गोपाळ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून, सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी तथा नायब तहसीलदार अमोल बन यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून संपूर्ण कामकाजावर देखरेख ठेवली. त्यांच्यासोबत महसूल सहाय्यक विजय कोळी, प्रवेशक मोरे व श्री. मोरे यांनी BLO यांच्याकडून फॉर्म भरणे, कागदपत्रांची पडताळणी, अर्जांची छाननी व प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याचे काम करून घेतले.

कासोदा ब्लॉकमधील सर्व BLO यांनी अत्यंत जबाबदारीने व समन्वयाने काम करत मोठ्या प्रमाणावर SIR फॉर्म नोंदणी पूर्ण केली असून उर्वरित काम अंतिम टप्प्यात आहे. नागरिकांनीही प्रशासनाला उत्स्फूर्त सहकार्य करत आवश्यक कागदपत्रांसह वेळेत फॉर्म सादर केल्याने अभियानाला मोठे यश मिळत आहे.

महसूल प्रशासनाच्या नियोजनबद्ध कार्यपद्धतीमुळे कासोदा ब्लॉकची कामगिरी तालुक्यात विशेष ठरत असून, अंतिम मुदतीपूर्वी शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यामुळे कासोदा ब्लॉकची SIR फॉर्म नोंदणी मोहीम तालुक्यासाठी आदर्श ठरत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 0 4 3 4 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे