श्री संत सेनाजी महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी. कासोदा ..!
श्री संत सेनाजी महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी. ककसोदा ..!

कासोदा प्रतिनिधी :- कासोदा येथे दि. २० ऑगस्ट बुधवार रोजी
सालाबादाप्रमाणे महादेव मंदिर आवारात संत सेनाजी महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली.
या प्रसंगी सकाळी दहा वाजेपासून महादेव मंदिरापासून पालखी मिरवणूकीस सुरुवात करण्यात आली. सदर मिरवणूक जामा मशीद, जुने पोलीस स्टेशन, मारुती मंदिर, बिर्ला चौक मार्गे प्रमुख मार्गांनी महादेव मंदिरात आणण्यात आली.
त्यानंतर महादेव मंदिरात संत सेनाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सत्यनारायणाची महापूजा गोपाल निकम यांनी सहपत्नीक केली. भटजी म्हणून प्रमोद पत्की महाराज हे होते. त्यानंतर मंदिर परिसरात समाज बांधवांसह काही प्रतिष्ठितांनी भोजनाचा आस्वाद घेतला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी नाभिक समाजाचे अध्यक्ष विनोद ठाकरे, उपाध्यक्ष अजय निकम, सचिव गणेश उर्फ बंटी ठाकरे, माजी अध्यक्ष राजेंद्र ठाकरे, मा. सचिव राजेंद्र ठाकरे, मा. उपाध्यक्ष वसंत सोनवणे, जितेंद्र ठाकरे, विनोद ठाकरे, अमर देवरे, अशोक ठाकरे, सागर ठाकरे , सुरेश ठाकरे, अशोक सोनवणे, गोपाल देवरे, सचिन देवरे, सोनजी सोनवणे, समाधान जाधव, राकेश ठाकरे, समाधान ठाकरे, पांडुरंग ठाकरे, शिवाजी ठाकरे, अरुण अहिरे आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.