भडगाव शहरातील पती-पत्नीविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा,दाखल आरोपी भडगाव पोलिसांच्या ताब्यात…!
भडगाव शहरातील पती-पत्नीविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा,दाखल आरोपी भडगाव पोलिसांच्या ताब्यात...!

भडगाव प्रतिनिधी :-हय्युम अली सैय्यद
भडगाव शहरातील महिलेवर झालेल्या गंभीर हल्ला प्रकरणात पोलिसांनी महत्त्वाची कारवाई करत गुन्ह्यातील फरार आरोपी ताब्यात घेतले आहे भडगाव शहरात जुन्या वादाच्याकारणावरून एका महिलेवर लोखंडी धारदार हुकने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना भडगाव शहरातील यशवंतनगर परिसरात घडली. होती
या प्रकरणी भडगाव पोलिसांनी पती-पत्नीविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ जून रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास यशवंतनगर येथील अस्लम बिस्मिल्ला शेख व त्याची पत्नी शमीम अस्लम शेख यांनी जुन्या वादातून कविता बाई सुरेश पाटील यांना शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर अस्लम शेख याने कविताबाईंना घरात ओढून नेत लोखंडी धारदार हुकने त्यांच्या गळ्याजवळ व शरीरावर दोन ते तीन वार केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणाचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या आदेशान्वये विशेष तपास पथक कार्यरत आहे. या पथकामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे LCB पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण पाटील, पोलीस निरीक्षक राहुल पाटील तसेच पोउनि सुशिल सोनवने इतर अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश आहे.
या दरम्यान, घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांकडून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून पुढील तपासाअंती अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे..



