कासोद्यात बँकेतून पैसे काढून आलेल्या महिलेची पैशांची पिशवी लंपास अज्ञात चोरट्याविरुद्ध कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…!
कासोद्यात बँकेतून पैसे काढून आलेल्या महिलेची पैशांची पिशवी लंपास अज्ञात चोरट्याविरुद्ध कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...!

उपसंपादक :-इमरान शेख
कासोदा शहरातील दि. 21 जुलै मंगलवार रोजी कासोदा येथे बँकेतून पैसे काढून आलेल्या एका महिलेची ₹47,630 ची पिशवी चोरट्याने लंपास केल्याची घटना आज सकाळी घडली.आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आशाबाई बाबूलाल देवरे (वय 50, रा. सोनबर्डी ता. एरंडोल) यांनी आज सकाळी सेंट्रल बँक, कासोदा शाखेतून ₹47,630/- रोख रक्कम काढली. त्यानंतर त्या कासोदा येथील चेतन इलेक्ट्रॉनिक्स दुकानासमोर साडी साफ करत असताना पैशांची पिशवी दुकानासमोरील बाकड्यावर ठेवली.
सकाळी सुमारे 11.00 ते 11.30 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने संधी साधून सदर पैशांची पिशवी लंपास केली. पिशवीत एकूण ₹47,630/- रोख रक्कम होती.
याप्रकरणी आशाबाई देवरे यांच्या फिर्यादीवरून कासोदा पोलीस स्टेशन येथे अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 303(2)नुसार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास कासोदा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली कासोदा पोलीस करीत आहेत.



