हातभट्ट्यांवर कासोदा पोलिसांच्या धाडी, पाच जणांना अटक, मुद्देमाल जप्त
हातभट्ट्यांवर कासोदा पोलिसांच्या धाडी, पाच जणांना अटक, मुद्देमाल जप्त

एरोंडोल तालुक्यातील कासोदा येथील पोलीस स्टेशन हद्दीत आंबे-ब्राह्मणे शिवारात वेगवेगळ्या ठिकाणी गावठी हातभट्टीवर कासोदा पोलिसांनी धाड टाकून पाच जणांना अटक केली. सुकलाल शालिक भिल, दीपक दशरथ भिल, धनराज अर्जुन भिल, नगराज तुकाराम भिल, वाल्मीक भीमा भिल सर्व राहणार आंबे ब्राह्मणे यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याजवळून हातभट्टी दारू तयार करण्याच्या साहित्यासह एकूण ७७ हजार रुपये किमतीचे २२०० लीटर कच्चे रसायन जप्त करण्यात आले. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाप्रमाणे पाच गुन्हे दाखल करण्यात आले.
ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक नीलेश राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, पोलीस कॉन्स्टेबल लहू हटकर, श्रीकांत ब्राह्मणे व सोनू पाचुंदे यांनी केली.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत यांच्या मार्गदर्शना खाली कासोदा पोलिस करीत आहेत.