Breaking
ब्रेकिंग

आमदार अमोल दादा पाटील यांची मंत्री प्रकाशजी आबिटकर यांच्याशी भेट; एरंडोलच्या आरोग्य सुविधांसाठी महत्त्वाच्या मागण्या…!

आमदार अमोल दादा पाटील यांची मंत्री प्रकाशजी आबिटकर यांच्याशी भेट; एरंडोलच्या आरोग्य सुविधांसाठी महत्त्वाच्या मागण्या...!

1 0 7 2 6 0

इमरान शेख उपसंपादक

मुंबई राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा.ना. प्रकाशजी आबिटकर यांची आमदार अमोल दादा पाटील* यांनी मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी एरंडोल विधानसभा मतदारसंघातील आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणावर* सविस्तर चर्चा झाली.

आमदारांच्या प्रमुख मागण्या..

1)कासोदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयात श्रेणीवर्धन* करण्यात यावे. यामुळे कासोदा व परिसरातील नागरिकांना स्थानिक पातळीवरच दर्जेदार व तातडीच्या आरोग्य सेवा मिळतील.

2)ब्राम्हणे येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजुरी द्यावी. यामुळे ग्रामस्थांना माता-बाल आरोग्य, लसीकरण व शासकीय आरोग्य योजनांचा लाभ सहज मिळेल.

चर्चेदरम्यान मंत्री महोदयांनी सर्व मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

आमदार अमोल दादा पाटील म्हणाले.. “मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाला गुणवत्तापूर्ण व सुलभ आरोग्य सुविधा मिळाव्यात. ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला बळकटी देऊन भविष्यातील गरजांनुसार आरोग्य पायाभूत सुविधांचा विस्तार करणे हेच आपले उद्दिष्ट आहे.”

एरंडोलच्या आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

1.5/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 0 7 2 6 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे