Breaking
ब्रेकिंग

एरंडोल शहरात चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आमदार अमोल दादा पाटील पोलीस ठाण्यात ४ तास ठिय्या आंदोलन…!

एरंडोल शहरात चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आमदार अमोल दादा पाटील पोलीस ठाण्यात ४ तास ठिय्या आंदोलन...!

0 9 6 4 1 1

एरंडोल प्रतिनिधी:-एरंडोल शहरात सामान्य व्यावसायिकांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या शासकीय अधिकाऱ्याचा कारनामा उघडकीस आला आहे. एका चहा विक्रेत्यावर खोट्या कारवाईचा बनाव करून त्याच्याकडून १० हजार रुपये उकळल्याप्रकरणी आमदार अमोल पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला. या घटनेचा निषेध म्हणून त्यांनी एरंडोल पोलीस ठाण्यात कार्यकर्त्यांसह चार तास ठिय्या मांडला, ज्यामुळे पोलीस प्रशासनाची मोठी धावपळ उडाली..

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल येथील मढी परिसरात चहा विक्री करणाऱ्या गजानन माधवराव महाजन यांच्या दुकानावर अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी किशोर बाविस्कर यांनी दोन दिवसांपूर्वी भेट दिली  दुकानातील स्वच्छतेचे व परवान्याचे कारण काढून कारवाईची भीती दाखवण्यात आली. ही कारवाई टाळण्यासाठी महाजन यांच्याकडून १० हजार रुपयांची मागणी करण्यात आली आणि ती रक्कम स्वीकारल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे..!

आमदारा अमोल दादा पाटील आक्रमक पवित्रा

या अन्यायाची माहिती मिळताच आमदार अमोल दादा पाटील यांनी पीडित व्यावसायिकाला घेऊन पोलीस ठाणे गाठले. मात्र, सुरुवातीला पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याने आमदर पाटील यांनी पोलीस ठाण्यातच बसण्याचा निर्णय घेतला “सामान्य माणसाची लूट करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला..

गुन्हा दाखल..!

आमदारा अमोल दादा पाटील ठिय्या आंदोलनानंतर आणि वाढत्या जनक्षोभामुळे पोलीस प्रशासनाने नमते घेतले. अखेर रात्री उशिरा संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला या कारवाईमुळे एरंडोलमधील व्यापारी वर्गात समाधान व्यक्त केले जात असून, भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत…

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 6 4 1 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे