तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना तलाठीसह एक खाजगी पंटर जळगाव एसीबीच्या जाळ्यात
उपसंपादक – कल्पेश महाले
कोळगाव – तक्रारदार पुरुष वय-४९, रा. कोळगाव ता. भडगाव, जि. जळगाव येथील रहिवासी असून तक्रारदार यांची भडगाव तालुक्यातील सावदे शिवारातील वडिलोपार्जित शेत जमीन आहे. सदर जमीन वरून तक्रारदार यांचे बहिणीचे हक्क सोड पत्राची नोंद करण्यासाठी व ७/१२ उतारे देण्याच्या मोबदल्यात 1)विलास बाबुराव शेळके, तलाठी पिंप्रीहाट ता. भडगाव व 2)खाजगी इसम धिरज (पूर्ण नाव माहित नाही) यांनी तक्रारदार यांच्याकडे प्रथम ४०००/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती ३०००/- रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. म्हणून भडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
यांच्या पथकाने केली कारवाई
योगेश ठाकूर पोलीस उपाधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, महिला पोहेकॉ.शैला धनगर, पोकॉ. राकेश दुसाने, अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने केली आहे.