चाळीसगाव तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा दुर्दैवी मृत्यू
उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगाव – तालुक्यातील गणपूर तांडा शिवारात रात्री १० वाजेच्या सुमारास येथील पोलीस पाटील रोहिदास पाटील यांच्या शेतात येवला तालुक्यातील मेंढपाळ कुटुंब हे मेंढ्या चराईसाठी आलेले असता त्यांच्याकडे कामाला असणारा आदिवासी समाजातील राहुल नवनाथ मोरे वय-१८ या मुलाचा बिबट्याचा हल्ल्यात मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.
ही माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
या घटनेची माहिती मिळताच आमदार मंगेश चव्हाण यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली व सदर मेंढपाळ कुटुंबियांचे सांत्वन केले तसेच तात्काळ वनविभागाला आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहे. मयत राहुल मोरे याच्या वारसांना आर्थिक मदत मिळवून देण्याबाबत कार्यवाही करण्याचे त्यांनी सांगितले.