महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे आदर्श सरपंच पुरस्कार” शौ शारदा ताई पाटील सन्मानित..
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे आदर्श सरपंच पुरस्कार" शौ शारदा ताई पाटील सन्मानित..

पाचोरा प्रतिनिधी :- जैनुल शेख उत्राण
एरोंडोल तालुक्यातील उत्राण अ. ह येथील शौ शारदा ताई पाटील यांना आदर्श सरपंच पुरस्कार” प्रदान करून सन्मानित करण्यात आल
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे आयोजित विशेष कार्यक्रमात आज सरपंच शौ शारदा ताई पाटील यांना “आदर्श सरपंच पुरस्कार” प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार मा. आमदार दिलीपभाऊ वाघ, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे तसेच कार्याध्यक्ष निलेश सोमानी यांच्या शुभहस्ते देण्यात आला. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी शौ शारदा ताई पाटील यांच्या कार्याचे कौतुक करताना उत्राण येथे विकासकामांची प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमास संघाचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर रायसाकडा , प्रदेश सदस्य तथा उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष अबरार मिर्झा , उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष राकेश सुतार व विविध पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाला स्थानिक मान्यवर, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी सर्व उपस्थितांनी शौ शारदा ताई पाटील यांच्या भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.