Breaking
जळगावधुळेनंदुरबारनाशिकब्रेकिंगमहाराष्ट्र

दहा लाखांची लाचेची मागणी भोवली; बहाळ ग्रामपंचायतीचा सरपंच, लिपिकसह एक खाजगी पंटर दोन लाखांची लाच घेतांना धुळे एसीबीच्या जाळ्यात.

0 6 1 1 5 2

उपसंपादक – कल्पेश महाले

चाळीसगाव – तक्रारदार हे मौजे बहाळ रथाचे, ता. चाळीसगांव जि. जळगांव येथील रहिवासी असुन त्यांची मौजे बहाळ रथाचे येथे त्यांचे मालकी कब्जे वहीवाटीतील शेतजमीन असुन सदर शेतजमीनीवर ग्रामपंचायत बहाळ हे त्यांचा हक्क दाखवुन सदरची जागा परस्पर इतर व्यक्तीस भाडेतत्वावर देण्याची शक्यता असल्याने तक्रारदार यांनी मा. दिवाणी न्यायालयाकडुन ग्रामपंचायत बहाळ यांचेविरुध्द कायम स्वरुपी मनाई हुकुम आणला होता.

त्यानंतर सरपंच राजेंद्र महादु मोरे यांनी तक्रारदार यांना भेटुन त्यांच्या शेतजमीनी बाबत कोर्ट कचेऱ्यांचा त्रास होवु दयायचा नसेल तर सदर शेतजमीनीतुन दिड हजार चौरस फुटाचा प्लॉट त्यांना खरेदी करुन दयावा लागेल असे सांगितले. तेव्हा तक्रारदार यांनी प्लॉट स्वरुपात ते काहीएक देवु शकणार नसल्याचे सांगितल्याने सरपंच राजेंद्र मोरे यांनी १०,००,००० /- रुपये दयावे लागतील अन्यथा ग्रामपंचायतीकडुन तुला कोर्ट कचेऱ्यांचा त्रास सहन करावा लागेल असे सांगितल्याने तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक धुळे कार्यालयात समक्ष येवुन तक्रार दिली होती.

तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीची दि. २९/११/२०२४ रोजी पंचांसमक्ष पडताळणी केली असता सरपंच राजेंद्र मोरे व लिपीक शांताराम बोरसे यांनी तक्रारदार यांचेकडे दिड हजार चौरस फुटांचा प्लॉट खरेदी करुन देण्याच्या स्वरुपात लाचेची मागणी केली असता त्यास तक्रारदार यांनी नकार दिल्याने सरपंच राजेंद्र मोरे व लिपीक शांताराम बोरसे यांनी १०,००,००० /- रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती ५,००,०००/- रुपये लाच स्विकारण्याचे मान्य केले होते.

त्यानंतर सरपंच राजेंद्र मोरे व लिपीक शांताराम बोरसे यांनी तक्रारदार यांना भेटुन लाचेची रक्कम दि. २६. १२.२०२४ रोजी बहाळ येथे तक्रारदार यांच्या राहते घरी खाजगी इसम सुरेश ठेंगे यांचेकडेस देण्याचे सांगितले होते. त्याप्रमाणे आज दि. २६.१२.२०२४ रोजी तक्रारदार यांचे बहाळ येथील राहत्या घरी सापळा लावला असता सरपंच राजेंद्र मोरे व लिपीक शांताराम बोरसे यांनी सांगितल्या प्रमाणे लाचेच्या रकमेपैकी पहिला हप्ता २,००,०००/- रुपये पंचांसमक्ष स्विकारतांना खाजगी इसम सुरेश ठेंगे यांना रंगेहात पकडण्यात आले असुन राजेंद्र महादु मोरे, सरपंच, शांताराम तुकाराम बोरसे, लिपीक, ग्रामपंचायत, बहाळ रथाचे, ता. चाळीसगांव जि. जळगांव व खाजगी इसम सुरेश सोनु ठेंगे यांचेविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

सदरची सापळा कारवाई मा. शमिष्ठा घारगे वालावलकर, पोलीस अधीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रविण मोरे, रामदास बारेला, प्रविण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांच्या पथकाने केली आहे.

3.4/5 - (5 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 1 1 5 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे