Breaking
ब्रेकिंग

भडगाव शहर येथे जिल्हा परिषद उर्दू शाळेत नवीन केंद्रप्रमुखांचा शाळा व्यवस्था समितीकडून उत्साहात सत्कार…!

भडगाव शहर येथे जिल्हा परिषद उर्दू शाळेत नवीन केंद्रप्रमुखांचा शाळा व्यवस्था समितीकडून उत्साहात सत्कार...!

1 0 2 7 2 8

भडगाव प्रतिनिधी :-हय्युम अली सैय्यद

भडगाव:-भडगाव शहरातील, दि.२५जून रोजी  स्थानिक जिल्हा परिषद उर्दू शाळा यशवंत नगर भडगाव शाळेमध्ये नूतन केंद्रप्रमुख म्हणून पदभार स्वीकारलेल्या

शारिक शेख अब्दुल रज्जाक यांचा शाळा व्यवस्था समिती वतीने नुकताच सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा परिषद उर्दू शाळा यशवंत नगर च्या विद्यार्थ्यांच्या कुराणाच्या तिलावतने प्रार्थनेने झाली.

त्यानंतर शाळा व्यवस्था समितीचे अध्यक्ष पत्रकार हय्युम सय्यद व उपाध्यक्ष नाझिम मेहमूद शेख यांनी पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन नूतन केंद्रप्रमुख शारिक शेख अब्दुल रज्जाक यांचे स्वागत केले.

यावेळी उपस्थित मान्यवरांसमोर बोलताना केंद्रप्रमुख शारिक शेख अब्दुल रज्जाक यांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर, उपस्थितीवर आणि पायाभूत सुविधांवर भर दिला जाईल, असे आश्वासन दिले. तसेच महाराष्ट्र शासनाच्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत गुणवत्तेत वाढ करण्यासाठी समितीच्या सदस्यांनी सहकार्य करावे,

असे आवाहन त्यांनी केले. शाळा व्यवस्था समिती आणि शिक्षकांनी मिळून शाळेला आदर्श शाळा बनवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.सदर सत्कार समारंभास शाळा व्यवस्था समितीचे अध्यक्ष पत्रकार हय्युम सय्यद व उपाध्यक्ष नाझिम मेहमूद शेख व सर्व सदस्य, शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन

शाळेचे मुख्याध्यापक शेख खालील सर, शिक्षक अब्दुल जावेद सर, सय्यद शाहिद सर, तसलीम खान सर,नूर सर,जुनेद सर,व पालक उपस्थित होते यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली..

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 0 2 7 2 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे