भवाळी ग्रामपंचायत प्रशासनावर दुर्लक्षाचा नागरिकांचा गंभीर आरोप…!
भवाळी ग्रामपंचायत प्रशासनावर दुर्लक्षाचा नागरिकांचा गंभीर आरोप...!

जिल्हा प्रतिनिधी :- कलिम सैय्यद
चाळीसगाव,तालुक्यातील भवाळी येथे दोन महिन्यांपासून गटारी तुंबल्या, मेन रस्त्यावर साचले घाणेरडे पाणी तरी ग्रामपंचायत चे दुर्लक्ष असे ग्रामस्थांनी केले आरोप
दि.१५जुलै २०२६- रोजी चाळीसगाव तालुक्यातील भवाळी गावातील ग्रामपंचायत प्रशासनाच्या कारभारावर गावकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गावातील गटारीचे चेंबर गेल्या दोन महिन्यांपासून ब्लॉक आहेत. त्यामुळे घाणेरडे पाणी मेन रस्त्यावर साचत असून संपूर्ण गावात दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य पसरले आहे. याबत सरपंच आणि ग्रामसेवक यांच्याकडे लेखी तसेच तोंडी तक्रारी करूनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
गावकऱ्यांचे आरोप..
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, “भवाळी ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामसेवक हे नागरिकांच्या समस्यांशी खेळत आहेत. दोन महिन्यांपासून आम्ही वारंवार अर्ज दिले आणि प्रत्यक्ष भेटून सांगितले. तरीही गटारी साफ करण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे रस्त्यावर डबके साचून डास, माशांचा प्रादुर्भाव वाढला आहे. लहान मुले आणि वृद्धांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
निधीचा हिशोब द्या?
राज्य सरकार गावाच्या विकासासाठी मोठा निधी देत आहे. मग तो निधी भवाळी ग्रामपंचायत नेमका कुठे वापरत आहे? गावाची अवस्था पाहता कुठेही विकास दिसत नाही. फक्त कागदावरच कामे दाखवली जात आहेत,?असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
आरोग्याचा प्रश्न गंभीर..
मेन रस्त्यावर साचलेल्या घाणेरड्या पाण्यामुळे नागरिकांना ये-जा करणे कठीण झाले आहे. पावसाळ्यात या पाण्यातून साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली. ग्रामपंचायतीने तात्काळ गटारी साफ करून स्वच्छतेची व्यवस्था करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
प्रशासनाने लक्ष द्यावे..
या प्रकरणी संबंधित यंत्रणेने तात्काळ चौकशी करून भवाळी ग्रामपंचायतवर कारवाई करावी आणि गावकऱ्यांना स्वच्छता व आरोग्याच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे..



