Breaking
ब्रेकिंग

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने जळगाव जिल्हा पुरवठा अधिकारी यांना आंदोलनचा इशारा…! 

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने जळगाव जिल्हा पुरवठा अधिकारी यांना आंदोलनचा इशारा...! 

0 9 3 8 5 2

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने नवीन रेशन कार्ड धारकांना रेशन मिळावे या मागणी साठी जळगाव जिल्हा पुरवठा अधिकारी यांना निवेदन…!

एरंडोल प्रतिनिधी :-

सामाजिक परिवर्तन हाच आमचा संकल्प….!

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने ,  जळगाव जिल्हा पुरवठा अधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा  केली असता दरम्यान अधिकारी यांनी असे कळविण्यात आले कि त्वरित तालुका स्तरावरून अहवाल मागविण्यात येईल असे सांगितले आहे.

सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले की एरंडोल तालुक्यातील रेशन कार्ड धारकांना शासनाने ठरवून दिलेल्या अटीप्रमाणे दरमहा रेशन वितरित करण्यात येते,मात्र नवीन रेशन कार्ड धारकांना कोणत्याही प्रकारचा कोठा लागू केलेला नसल्यामुळे रेशन मिळत नाही.काही रेशनकार्ड धारकांनी कुटुंब वेगवेगळे झाल्यानंतर, लग्न झाल्यानंतर रेशनकार्ड वेगळे केले आहेत.तर त्यांना नवीन रेशन कार्ड बनवून मिळते.  परंतु यांवर रेशन मिळत नाही. काही रेशनकार्ड धारक हे अत्यंत गरीब असतात मोल मजुरी करून उदरनिर्वाह करणारे असतात मात्र रेशन कार्डवर त्यांना रेशन मिळत नाही नसल्यामुळे कुटुंबाची मोठी अडचण होते. शासनाच्या अनेक महत्त्वाकांक्षी योजना जनतेच्या कल्याणाकारी असल्या तरी गतिमान प्रशासन म्हणून नावलौकिक असलेल्या शासन दरबारी रेशन नवीन कोठा व वाढीव कोठा मंजूर होत नसल्यामुळे नवीन रेशन धारक सदर योजनेच्या लाभ घेण्यापासून वंचित आहेत. तसेच एरंडोल तालुक्यातील प्रत्येक स्वत धान्य दुकान वर सुसुत्रता यावी.नवीन रेशनकार्ड धारकांना रेशन मिळणे बाबत त्वरित संबंधितांना आदेश  देण्यात यावेत.असे निवेदनात म्हटले आहे.  अन्यथा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असे रिपब्लिकन पक्षाचे एरंडोल तालुकाध्यक्ष तथा उपविभागीय दक्षता व संनियंत्रण समिती सदस्य प्रवीण बाविस्कर,  एरंडोल महीला आघाडी तालुकाध्यक्ष माया ताई खैरनार यांनी सांगितले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 3 8 5 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे