पैशासाठी महिलांचा मानसिक छळ करत, दोन मुली व एक मुलासह महिलेला केले घराबाहेर…. महिलाची न्यायालयात धाव …

पैशासाठी महिलांचा मानसिक छळ करत, दोन मुली, एक मुला सहित केले महिलेला घराबाहेर…. महिलाची न्यायालयात धाव …
कासोदा – पैशासाठी महिलाचा मानसिक छळ, व पदाचा गैरवापर केल्या प्रकरणी परवीन बी रिजवान अली (३१) यांच्या फिर्याद देऊन पती, सासू, सासरे यांच्यावर कारवाई साठी न्यायालयात धाव घेतली आहे.
माहेराहून व्यापारासाठी पैसे आणण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून सासरची मंडळी परवीन बी यांचा छळ करत होती. व्यापारासाठी पैसे आणण्यास परवीन बी यांनी विरोध दर्शवल्याने इतर शुल्लक घरगुती कारणांवरून मारहाण मानसिक, शारीरिक छळ केला जात असल्याने पतीसह सासरच्या मंडळी विरुद्ध परवीन बी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
त्यात फिर्यादी परवीन बी यांनी केलेल्या मागणी अर्ज मध्ये खालीलप्रमाणे माहिती दिली आहे.
सविस्तर बातमी अशी की, व्यापारासाठी माहेरवरून ७/८ लाख रुपये आणण्याची मागणी सासरची मंडळी अनेक दिवसांपासून परवीन बी यांच्या जवळ करत होती. परंतु परवीन बी यांनी पैशाची मागणी माहेरी न केल्याने क्षुल्लक कारण पुढे करून महिलेस मारहाण करून मानसिक शारीरिक छळ सह, मारून टाकण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. तरी सुद्धा परवीन बी हे सर्व सहन करत होती. आता नुकत्याच ईदच्या चार ते पाच दिवस अगोदर परवीन बी यांच्या पतीने व सासरच्या मंडळींने माहेरवरून ताडपत्री व्यापार करण्यासाठी छोटा हत्ती गाडीसाठी ८ ते १० लाख रु माग असा तगादा लाऊन ठेवला, परवीन बी ने पैशाची मागणी साठी नकार दिल्याने, १८ जून ला ईद च्या दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजे दरम्यान परवीन बी ला मारठोक करून माहेर वरून पैसे आनण्यासाठी घरातून काढून दिले. परवीन बी हिने विरोध केल्यावर परवीन बी हीचा स्वतःच्या लहान २ वर्षाचे मुलाला हिसकावून घेतले, पैसे आन, नाहीतर मुलासहित घर सोड असे म्हणत परवीन बी ला मार ठोक केली व परवीन बी सह दोन मुलींसह एका मुलाला घराबाहेर करून तिच्या पतीने आत मधून दरवाजा बंद करून घेतला.
सदर परवीन बी व दोन मुली, एक मुलगा हे किमान दोन तास घराबाहेर उभी होती, परंतु पतीसह घरच्या व्यक्तींनी दरवाजा न उघडल्याने ती माहेरच्या मंडळींकडे गेली व घडलेली घटना सांगितली. त्यावर माहेरच्या मंडळींनी परवीन बी ह्यास पैसे देण्यास नकार दिला. गावातील पंचकमिटी च्या मध्यस्तीने परवीन बी व त्यांचे पतीचे जुळवून यावे यासाठी गावातील पंच मंडळींची बैठक ठेवण्यात आली होती. बैठकीला जमलेल्या पंचांनी परवीन बी चे पती रिजवान अली मुक्तार अली यास कॉल करून बैठकीला बोलावणी केली. परंतु बैठकीला परवीन बी चे पती रिजवान अली मुक्तार अली याने येण्यास नकार दिला. मला परवीन बी ह्यास वागवणे नसून तुम्हाला जे करायचे ते करा असे बोलून फोन कट केला. रिजवान अली यांचे असे उत्तर एकूण यावर पंच कमिटीने सुद्धा नाराजी दर्शवली, शेवटी परवीन बी चे पती हे आमचे सुद्धा एकत नाही, तुमच्या परीने तुम्ही काय करायचे ते करा असे म्हणून पंच मंडळींनी बैठक संपवली.
यानंतर दोन दिवस वाट बघितल्या नंतर दिनांक २० जून रोजी परवीन बी ही सासरच्या घरी गेल्यावर घराला लॉक आढळून आले, सासरचे मंडळींनी पतीसह मुद्दामहून बाहेरगावी लहान शा मुलाला घेऊन गेल्याने, माहेर वरून पैसे न आणल्याने छळ करत असल्याची फिर्याद परवीन बी यांनी पतीसह सासरच्या मंडळी विरुद्ध स्थानिक कासोदा पोलीस स्टेशन ला केली.
पोलीस स्टेशन ला अर्ज दिल्या नंतर स्थानिक पोलीस स्टेशन चे कर्मचारी यांनी समज साठी परवीन बी यांचे पती व दिरास ला कॉल केले असल्यावर सुद्धा परवीन बी चे पती व सासरची मंडळींनी हे हजर झाले नाही. त्यामुळे त्याच्या पती विरुद्ध दिनांक २० जून रोजी परवीन बी यांच्या फिर्यादीवरून ३२३, ५०४, ५०६, प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.


माझे पती हे शुल्लक कारणावरून मला मारझोड करतात, वारंवार मला जिवे मारण्याची धमकी देतात, यावर मी काही करायचे म्हटले तर माझा भाऊ उपसरपंच आहे. मोठमोठ्या लोकांशी चांगले सबंध आहे. माझे काहीच होऊ शकत नाही तुला जे करायचे ते कर. असे म्हणत मला वारंवार मारहाण करतात. नेहमी दोन तीन महिन्यात यांची माझ्या वडिलांकडून व्यापासासाठी पैसे आन म्हणून तगादा असतो. आता मी पैसे आणण्यास नकार दिल्याने त्यांनी माझ्या दोन वर्षाच्या मुलाला हिसकावून मला व माझ्या तीन मुलांना घराबाहेर काढून दिले. मी व माझ्या दोन मुली व मुलगा किमान दोन तास घराबाहेर होते, पण त्यांना त्याची कीव आली नाही. माझे दिर हे गावाचे उपसरपंच आहे. जर उपसरपंच यांच्या घरातच मलाच या न्याय मिळत नसेल व अशी अमानुष वागणूक मिळत असेल तर बाकी गावातील महिलांना न्याय कोण आणि कसा मिळेल? असा प्रश्न परवीन बी यांनी केला आहे.



