सरकारी नोकरीचे अमिष दाखवून लोकांना फसविणाऱ्या तोतया वन अधिकारी ला पोलीसांकडून अटक.
(उपसंपादक – कल्पेश महाले)
चाळीसगांव:- शहरातील तक्रारदार निखिल सुरेश पगारे, वय ३० वर्ष, रा.चौधरी वाडा चाळीसगाव. हा शहरातील एका मेडिकलवर खाजगी नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवित असतो. त्याचे बी.फार्मसी चे शिक्षण झालेले असून सरकारी नोकरी मिळण्यासाठी स्पर्धा परीक्षा देत आहे. दोन वर्षांपूर्वी त्याची ओळख चाळीसगाव येथील एका खाजगी ॲम्बुलन्स चालक नामदेव वाघ यांच्याशी झाली होती. त्यावेळी नामदेव ने निखिलला कंत्राटी कर्मचारी म्हणून ग्रामीण रुग्णालय येथे काम आहे तू करशील का असे विचारले होते. परंतु निखिलने त्याला कंत्राटी नको सरकारी परमनंट नोकरी असेल तर सांगा असे सांगितले होतो.
दिनांक १६/०९/२०२४ रोजी सकाळी ११ वा. च्या सुमारास निखिल त्याच्या राहते घरी चौधरी वाडा चाळीसगाव येथे असताना ॲम्बुलन्स चालक नामदेव वाघ यांनी मला फोन करून ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव येथे येण्यास सांगितले. त्यावेळी मी ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव येथे गेलो त्यावेळी नामदेव वाघ मला म्हणाला की, माझ्या जवळचा व्यक्ती नाशिक वन विभागात आर.एफ.ओ. म्हणून आहे. त्यांच्यामार्फत तुझे काम होऊन जाईल तुला पुढील पाच महिन्यात वनविभागात वनरक्षक म्हणून ऑर्डर भेटेल. साहेब सुट्टीवर आले असून आपण उद्या हॉटेल वर्षा येथे भेटून त्यांच्याशी चर्चा करून तुझ्या कामाचे नियोजन करू. त्यानंतर दिनांक १७/०९/२०२४ रोजी १२:३० वा. च्या सुमारास मी हॉटेल वर्षाजवळ, दसेगाव शिवार, धुळे रोड ता. चाळीसगाव येथे नामदेव वाघ व त्याचे मित्र आर.एफ.ओ. यांना भेटण्यासाठी गेलो. त्यावेळी तेथे नामदेव वाघ हे हजर होते. काही वेळाने तेथे एका मोटरसायकलवर एक जण आला. त्याची ओळख नामदेव वाघ यांनी करून दिली की, हे आर.एफ.ओ. नितीन पगारे आहेत. त्यावेळी नितीन पगारे याने मला सांगितले की, तुझे काम वनरक्षक या पदावर होईल. त्यासाठी पाच लाख रुपये द्यावे लागतील. त्यापैकी दोन लाख रुपये सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत द्यावे लागतील. बाकी पैसे काम झाल्यावर, जे काही बोलायचे ते नामदेव वाघ बोलतील. त्यावेळी मी नितीन पगारे यांना त्यांचे ओळखपत्र विचारले असता त्यांनी मला त्यांच्या मोबाईल मध्ये वनअधिकाऱ्याच्या शासकीय गणवेश घातलेला त्याचा फोटो दाखविला असता त्यावेळी मी त्यांना एक लाख रुपये आज सायंकाळी देतो व एक लाख रुपये उद्या देतो असे सांगितले. ठरले प्रमाणे मी दिनांक १७/०९/२०२४ रोजी सायंकाळी ५:०० वा.च्या सुमारास मी वर्षा हॉटेल जवळ जाऊन रोख रक्कम एक लाख रुपये नामदेव वाघ व नितीन पगारे यांच्याकडे दिले. त्यावेळी नितीन पगारे याने काम होऊन जाईल उद्या एक लाख रुपये जमा करा असे सांगितले. अशी सर्व हकीकत माझे मित्र महेश पाटील हे पोलीस कर्मचारी असून मी त्यांना सांगितली. त्यावेळी त्यांनी खात्री करून सांगतो असे म्हणून सांगितले. आज रोजी माझे मित्र महेश पाटील यांनी मला सांगितले की, तुझी फसवणूक झाली आहे. नितीन पगारे हा तोतया अधिकारी असून त्याने याच प्रमाणे यापूर्वी देखील तरुणांना नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसविले आहे. नितीन पगारे याने माझ्याप्रमाणे अनेक लोकांना फसविले आहे. तसेच त्याबाबत नितीन पगारे याचे विरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. त्यावेळी माझी फसवणूक झाली असल्याची खात्री झाली. दि. १८/०९/२०२४ रोजी सायंकाळी ५:०० वा.च्या सुमारास मी नितीन पगारे व नामदेव वाघ यांच्याशी ठरले प्रमाणे भेटीसाठी जाणार होतो. त्यावेळी माझे मित्र महेश पाटील व त्यांचे सोबतचे पोलीस सहकारी संदीप पाटील, सागर पाटील हे त्यांच्या कामानिमित्त चाळीसगाव परिसरात आलेले असल्याचे मला समजल्याने मी त्यांना हॉटेल वर्षा जवळ बोलवून घेतले. त्यांच्या मदतीने मी माझी फसवणूक करणारे नितीन पगारे व नामदेव वाघ यांना पकडले. त्यावेळी माझे मित्र महेश पाटील यांनी त्यांना त्यांची नावे विचारले असता त्यांनी त्यांची नावे नितीन रवींद्र पगारे रा.बहाळ रथाचे ता.चाळीसगाव व नामदेव परभत वाघ रा.ग्रामसेवक कॉलनी चाळीसगाव असे असल्याचे सांगितले. तेव्हा नितीन पगारे याने कबुली दिली की, मी वनविभागात कुठेही कोणत्याही पदावर कार्यरत नाही. परंतु मी लोकांना वन अधिकारी असल्याचे सांगून वावरत असतो. त्यावेळी आमची खात्री झाली की, नितीन पगारे व नामदेव वाघ यांनी माझी व सौरभ ठाकरे असे आमची फसवणूक केली आहे. मी महेश पाटील व त्यांच्यासोबतचे पोलीस सहकारी यांच्या मदतीने नितीन पगारे व नामदेव वाघ यांना मेहुणबारे पोलीसांना कळविले असता यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे, पोलीस अंमलदार योगेश पाटील, संजय पाटील यांच्या ताब्यात दिले.
निखिल पगारे याच्या फिर्यादीवरून सदरील नामे नितीन पगारे व नामदेव वाघ यांच्यावर मेहुणबारे पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता २०२३ ३१८(४), २०२३ ३१६(२), २&०२३ ३(५) नुसार गुन्हा पोलीस नाईक नंदकिशोर महाजन यांनी दाखल केला असून सदर आरोपींना दिनांक १९/०९/२०२४ रोजी चाळीसगाव मा.न्यायालयात हजर केले असता मा.न्यायालयाने आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक जालमसिंग पाटील करीत असून या प्रकरणात ज्या लोकांना या आरोपीने सरकारी नोकरीचे आमिष दाखवून फसविले आहे त्यांनी मेहुणबारे पोलीस स्टेशन शी संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांनी केले आहे.