Breaking
ब्रेकिंग

सकल मांग गारूडी समाजाचे पाचोरा येथील आमरण उपोषण प्रशासनाच्या आश्वासनानंतर स्थगित….!

सकल मांग गारूडी समाजाचे पाचोरा येथील आमरण उपोषण प्रशासनाच्या आश्वासनानंतर स्थगित....!

1 0 9 2 9 9

जिल्हा प्रतिनिधी:-कलीम सैय्यद

पाचोरा,:-दि. 17 ऑगस्ट रोजी पाचोरातालुक्यातील मोजे नगर देवळा, येथील मांग गारूडी समाज बांधवांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आज सकल मांग गारूडी समाजा तर्फे प्रांत अधिकारी कार्यालय व तहसीलदार कार्यालय पाचोरा येथे आमरण उपोषण करण्यात आले.

उपोषण चे प्रमुख मागण्या

1/स्मशान भूमी वॉल कंपाऊंड

2/दफन भूमीवर होणारा अडथळा  व वाद दूर करणे

3/दफनभूमी च्या दृष्टीने वॉल कंपाऊंड करणे

4/जातीचे दाखले

या उपोषणाला मांग गारूडी समाजाचे राष्ट्रीय नेते मा. अमरजी कसबे साहेब (आर.पी.आय. महाराष्ट्र राज्य सचिव) आणि शाहीर वाल्मिक फाजगे खेडगांवकर (कवी, लेखक) यांचे मार्गदर्शन लाभले.

उपोषणकर्ते:

उपोषणाच्या पहिल्या दिवशी श्री. सुरेश नाना राखुंडे यांच्यासह श्री. विनोद नामदेव अहिरे, आकाश महादू कसबे, किशोर उत्तम कसबे, केशव महादू कसबे, दिलीप दत्तू कसबे, विशाल रक्षे गोकुळ यादव चव्हाण, पिरा सुधाकर हातागळे, गोकुळ हातागळे, विजय हिरामण ढोलवाले, राहुल हिरामण ढालवाले, महेंद्र दशरथ लोंढे, केशव कसबे, फकिरा कसबे, कैलास नवल फाजगे, खटया दादा, ज्ञानेश्वर भीमा फाजगे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

“जय शिवराय, जय भीम, जय शिबारी” च्या घोषणांनी उपोषणाला सुरुवात झाली.

प्रशासनाची भेट आणि आश्वासन…

सायंकाळी 4:00 वाजेच्या सुमारास सन्माननीय तहसीलदार साहेब, प्रांत अधिकारी आणि बी.डी.ओ. साहेब यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा केली. समाजाच्या मागण्यांवर लवकरात लवकर योग्य निर्णय घेऊन कारवाई केली जाईल, असे लेखी पत्रक देऊन उपोषणाला स्थगिती देण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले.

प्रशासनाने दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले. मागण्यांवर लवकर ठोस कारवाई व्हावी, अशी अपेक्षा सकल मांग गारूडी समाजाने व्यक्त केली आहे…

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 0 9 2 9 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे