उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगाव – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात एकूण १६ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.
उमेदवारांची यादी खालील प्रमाणे
१) उन्मेष भैय्यासाहेब पाटील – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)
२) मंगेश रमेश चव्हाण – भारतीय जनता पार्टी
३) राजाराम बारकू मोरे – बहुजन समाज पार्टी
४) वाल्मीक सुभाष गरुड – सैनिक समाज पार्टी
५)संदीप अशोक लांडगे – राष्ट्रीय जनमंच
६) किरण मगन सोनवणे – अपक्ष
७) दिलीप फकिरा पाटील – अपक्ष
८) प्रकाश माणिक मोरे – अपक्ष
९) मुखतारखान बिस्मिल्ला खान कुरेशी – अपक्ष
१०) मंगेश कैलास चव्हाण – अपक्ष
११) योगेश्वर घेवरचंद राठोड – अपक्ष
१२) रुपाली अनिल पाटील – अपक्ष
१३) विकास त्रंबक चौधरी – अपक्ष
१४) शरद नामदेव सोनवणे – अपक्ष
१५) सुनील ताराचंद मोरे – अपक्ष
१६) संपदा उन्मेष पाटील – अपक्ष
या उमेदवारांमधून माघार कोणाची होते याकडे सर्वांचे लक्ष लागले असून सध्या सोशल मीडियावर आ.मंगेश चव्हाण आणि माजी खा.उन्मेष पाटील यांच्या भाषणात एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या पाढा जनतेसमोर वाचला जात आहे.
२०१४ विधानसभा निवडणुकीत आ.मंगेश चव्हाण यांनी भाजपचे माजी खा.उन्मेष पाटील यांच्या सोबत राहून मदत केली होती आणि राष्ट्रवादीचे मा.आ.राजीव देशमुख यांच्या विरोधात ते निवडून आले होते. पण आता चाळीसगावचे चित्र मात्र वेगळे आहे. काही महिन्यांपूर्वी भाजपचे खा. उन्मेष पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला आणि आता महाविकास आघाडीकडून शिवसेना कडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उन्मेष पाटील यांनी चाळीसगाव विधानसभा मतदार संघातून महायुती भाजपचे आ. मंगेश चव्हाण यांच्या विरुद्ध आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महाविकास आघाडी कडून माजी खा.उन्मेष पाटील यांच्या सोबत राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार गट) मा. आ. राजीव देशमुख देखील सोबत आहेत.
चाळीसगाव तालुक्यात आतापर्यंत केलेल्या विकास कामांमुळे आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर कोण निवडून येणार ? चाळीसगाव तालुक्यातील जनतेच्या मनातील आमदार कोण होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.