उंबरखेडच्या जि. प. उर्दू शाळेत 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा, “बेटी बचाओ, बेटी पढाओ” चा संदेश…!
उंबरखेडच्या जि. प. उर्दू शाळेत 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा, "बेटी बचाओ, बेटी पढाओ" चा संदेश...!

जिल्हा प्रतिनिधी :- कलिम सैय्यद
चाळीसगाव तालुक्यातील उंबरखेड, येथे दि. 15ऑगस्ट रोजी भारताच्या 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जि. प. उर्दू शाळा, उंबरखेड येथे देशभक्तीपूर्ण वातावरणात कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहण व राष्ट्रगीताने झाली.
यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, भाषणे आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. आझाद मैदान, उंबरखेड येथे झालेल्या गावातील सर्व शाळांच्या संयुक्त कार्यक्रमातही शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला “बेटी बचाओ, बेटी पढाओ”
या विषयावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम. यातून मुलींचे शिक्षण, संरक्षण आणि सशक्तीकरणाचा संदेश देण्यात आला.
विद्यार्थ्यांचे शिस्तबद्ध आणि देशभक्तीपूर्ण सादरीकरण उपस्थितांनी मोठ्या कौतुकाने पाहिले. 🇮🇳



