तलवारसह संशयास्पद व्यक्ती ताब्यात; सार्वजनिक शांतता भंग रोखण्यात यश. कासोदा पोलिसांकडून कारवाई:
तलवारसह संशयास्पद व्यक्ती ताब्यात; सार्वजनिक शांतता भंग रोखण्यात यश. कासोदा पोलिसांकडून कारवाई:

दि. 29 ऑगस्ट – कासोदा शहरातील फरकांडे चौफुली परिसरात एका व्यक्तीने हातात तलवार घेऊन संशयास्पद हालचाली केल्याची गुप्त माहिती पोलीसांकडे मिळाल्याने संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात आली. पोलीसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन आरोपीला ताब्यात घेतले आणि तलवार जप्त केली.
पोलीस सूत्रांच्या माहितीप्रमाणे, गुप्त बातमीदाराने सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत यांना माहिती दिली की, फरकांडे चौफुलीजवळ एक इसम तलवार घेऊन संशयास्पद हालचाली करत आहे. या माहितीच्या आधारे पो. अंमलदार नरेंद्र पाटील व पोलीस कर्मचारी सोनू पाचुंदे यांना घटनास्थळी रवाना केले गेले.
घटनास्थळी पोहचल्यावर आरोपी राघव रामा कुवर (टा. कोळबल्ली, चेंबर गलवाडा रस्ता, कासोदा) हातात तलवार घेऊन सार्वजनिक शांतता भंग करत असल्याचे निदर्शनास आले. पोलीसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये नेले. आरोपीच्या ताब्यातून 3 फूट लांब धारदार तलवार जप्त करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत, पो.उ. निरीक्षक धर्मराज पाटील, रामकृष्ण पाटील, नितीन सूर्यवंशी, राकेश खोंडे, श्रीकांत गायकवाड, निलेश गायकवाड, योगेश पाटील, दिपक देसले यांच्या पथकाने केली.
पोलीसांनी या कारवाईतून दाखवले की, गुप्त माहितीवरुन त्वरित कारवाई करणे आणि शहरातील सार्वजनिक शांतता राखणे हे त्यांच्या प्राथमिक उद्दिष्ट आहे. आरोपीविरुद्ध संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून,
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत यांच्या मार्गदर्शना खाली कासोदा पोलिस करीत आहेत.