Breaking
ब्रेकिंग

भडगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ…!

भडगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ...!

1 0 3 1 6 4

भडगाव प्रतिनिधी :-हय्युम अली सैय्यद

भडगाव शहरातील दि.२८जून रोजी बालकांना पोलिओमुक्त आणि निरोगी आयुष्य देण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा’ शुभारंभ आज भडगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयात दिमाखात पार पडला.

भडगाव शहरातील सन्माननीय आरोग्य सभापती सय्यद इमरान अली यांच्या हस्ते आणि प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस देऊन या मोहिमेची सुरुवात करण्यात आली.याप्रसंगी बोलताना आरोग्य सभापती सय्यद इमरान अली म्हणाले, भारत देश पोलिओमुक्त झाला असला तरी, शेजारील देशांमधील संसर्गाचा धोका पाहता खबरदारी म्हणून आपल्या लहान मुलांना पोलिओचे डोस देणे गरजेचे आहे. शून्य ते पाच वयोगटातील एकाही बालकाला पोलिओ डोस मिळण्यापासून वंचित ठेवले जाऊ नये, यासाठी आरोग्य विभागाने घरोघरी जाऊन सर्व्हे करावा.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, डॉक्टर, परिचारिका, आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.

पालकांना विशेष आवाहन: कोणताही बालक पोलिओ डोसपासून वंचित राहू नये म्हणून सर्व पालकांनी आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना नजीकच्या रुग्णालयात, प्राथमिक आरोग्य केंद्रात (PHC) किंवा अंगणवाडी केंद्रात घेऊन जाऊन पोलिओचे दोन थेंब आवर्जून पाजावेत, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

यावेळी उपस्थित टी. एम. ओ.श्री. समाधान वाघ सर,एम. ओ. श्री. फारूक शेख सर , श्री. पंकज जाधव सर व कर्मचारी बंधू बघीनी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते….

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 0 3 1 6 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे