Breaking
ब्रेकिंग

पारोळा नगरपालिकेला नवीन अद्यावत अग्निशमन गाडी प्राप्त; आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांच्या हस्ते लोकार्पण…

पारोळा नगरपालिकेला नवीन अद्यावत अग्निशमन गाडी प्राप्त; आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांच्या हस्ते लोकार्पण...

0 9 9 3 8 7

सत्यकाम न्यूज नेटवर्क

पारोळा : शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणारी नवीन अद्यावत अग्निशमन गाडी (फायर फायटर) शासनाकडून पारोळा नगरपालिकेला प्राप्त झाली असून लोकप्रिय आमदार मा.ॲड. अमोलदादा पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही गाडी मंजूर करण्यात आली आहे. शहरातील वाढती लोकसंख्या, विस्तारत चाललेला नागरी परिसर तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत पोहोचविण्याची गरज लक्षात घेता ही अग्निशमन गाडी पारोळा शहरासाठी मोठी दिलासादायक बाब मानली जात आहे.

आग लागणे, शॉर्टसर्किट, अपघात तसेच इतर आपत्कालीन घटनांमध्ये तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेली ही अग्निशमन गाडी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यामुळे पारोळा नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाची कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार असून शहरातील नागरिकांच्या सुरक्षेला अधिक बळ मिळणार आहे. अनेक दिवसांपासून शहरासाठी अद्ययावत अग्निशमन वाहनाची आवश्यकता असल्याची मागणी नागरिकांकडून होत होती. अखेर आमदार मा. ॲड. अमोलदादा पाटील यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, या नवीन अग्निशमन गाडीचे लोकार्पण व पूजन समारंभ आमदार मा. ॲड. अमोलदादा पाटील यांच्या संपर्क कार्यालयात त्यांच्या शुभहस्ते तसेच लोकनियुक्त नगराध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थित उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

या प्रसंगी शिवसेना शहरप्रमुख, गटनेते तथा नगरसेवक अमृतभाऊ चौधरी, उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक मनिषभाऊ पाटील, जेष्ठ पत्रकार बाळासाहेब पाटील, भूपेंद्र मराठे, विश्वास चौधरी, अभय पाटील, मा.उपनगराध्यक्ष सुदामबापू चौधरी, शिवसेना प्रतोद नितीन सोनार, नगरसेवक राजूभाऊ कासार, मनोजभाऊ जगदाळे, प्रमोदशेठ कासार, राजूबापू पाटील, बापू मिस्तरी, उपगटनेता तथा नगरसेवक पंकज मराठे, नगरसेवक नजीरखान बेलदार, इमरान शेख, गोपालशेठ दाणेज, विनोदभाऊ पाटील, दगडू पवार सर, संदेश शिरोळे, दिपक अनुष्ठान, भूषण टिपरे, बांधकाम व्यावसायिक पी.आर.वाणी, संजय गोसावी, पत्रकार प्रकाश पाटील यांच्यासह पत्रकार, नगरपालिकेचे आजी-माजी पदाधिकारी, अग्निशमक कर्मचारी उपस्थित होते.

नवीन अग्निशमन गाडी शहराच्या सेवेत दाखल झाल्यामुळे भविष्यात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत अधिक वेगाने आणि प्रभावीपणे मदतकार्य राबविणे शक्य होणार असल्याची भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 9 3 8 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे