Breaking
ब्रेकिंग

कासोदा आठवडे बाजार परिसर बनला घाणीचा विळखा मंगळवारी भाजीपाला इतर दिवशी हागणदारी…!

कासोदा आठवडे बाजार परिसर बनला घाणीचा विळखा मंगळवारी भाजीपाला इतर दिवशी हागणदारी...!

0 9 6 5 8 6

कासोदा प्रतिनिधी :- जळगाव जिल्ह्यातील कासोदा येथील मुख्य बाजारपेठेच्या जागेवर मंगळवारी मोठ्या प्रमाणावर आठवडे बाजार भरतो. परिसरातील २५ ते ३० गावांचे लोक बाजारासाठी व व्यापारासाठी येथे येत असतात.मात्र, याच जागेचा वापर इतर दिवशी उघड्यावर शौच करण्यासाठी केला जात असल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे.यामुळे बाजारात येणारे ग्राहक आणि व्यापारी यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून प्रशासनाच्या स्वच्छ भारत’ अभियानाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.?

बाजाराच्या दिवशी व्यापार इतर दिवशी दुर्गंधी:

कासोदा येथील हा आठवडे बाजार परिसरातील गावांसाठी व्यापाराचे मुख्य केंद्र आहे. मंगळवारी येथे भाजीपाला, धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंची मोठी उलाढाल होते. मात्र बुधवार ते सोमवार या काळात याच मोकळ्या जागेचा वापर काही नागरिक उघड्यावर शौचास बसण्यासाठी करत आहेत.आठवड्याच्या एक दिवस सोमवार रोजी येथे सफाई केली जाते.पण इतर दिवशी येथे शौचालय केले जाते.यामुळे मंगळवारी जेव्हा व्यापारी आपले दुकान थाटतात, तेव्हा त्यांना घाणीच्या साम्राज्यातच बसावे लागते.

शौचालयासाठी शासनाने प्रत्येक घरासाठी कासोदा गावासाठी निधी देण्यात आल्याचे ग्रामपंचायत प्रशासनातर्फे अधिकृत सूत्रांनी सांगितले , परंतु येथील काही नागरिक शौचालयाच्या उपयोग न करता आठवडे बाजाराच्या ठिकाणी उघड्यावर शौचास बसतात.तरी अशा उघड्यावर शौचास बसणाऱ्या नागरिकांवर कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी येथील नागरिक करीत आहेत.

रोगराईची भीती

भर बाजारात पसरलेल्या या अस्वच्छतेमुळे माश्यांचा प्रादुर्भाव वाढला असून, उघड्यावरील खाद्यपदार्थांवाटे रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे. “आम्ही हक्काचा कर भरतो , पण आम्हाला घाणीत बसून व्यापार करावा लागतो,” अशी व्यथा एका स्थानिक व्यापाऱ्याने मांडली. विशेषत पावसाळ्यात ही परिस्थिती अधिकच बिकट होते..!

प्रशासनाचे दुर्लक्ष?

गावात सार्वजनिक शौचालयांची कमतरता किंवा असलेल्या शौचालयांची दुरवस्था यामुळे नागरिक उघड्यावर जातात, असे स्थानिक सांगतात. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या जागेची स्वच्छता करावी आणि उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

ग्रामस्थांच्या मागण्या:

बाजारपेठेच्या जागेची नियमित स्वच्छता करून येथील शौचालयासाठी येणाऱ्यांवर कारवाई करावी.

परिसरात पुरेसे सार्वजनिक शौचालय उपलब्ध करून द्यावेत.

उघड्यावर शौचास बसणाऱ्यांना रोखण्यासाठी ‘गुड मॉर्निंग पथक’ सक्रिय करावे.

आता या गंभीर समस्येकडे ग्रामपंचायत आणि स्थानिक प्रशासन कधी लक्ष देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..!

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 6 5 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे