प्रतिनिधी कल्पेश महाले. (चाळिसगाव)
मेहुनबारे पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ३२३/ २०३० कलम ३७९ प्रमाणे दिनांक १२/१२/२०२३ रोजी पोहरे गावातील मनोज शंकर सोनवणे यांच्या गोठ्यातून नऊ बकऱ्या चोरीस गेलेल्या होत्या.
सदर गुन्ह्यातील आरोपी बाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.संदीप परदेशी यांना गोपनीय माहिती मिळाल्यावर अप्पर पोलीस अधीक्षक सौ.कविता नेरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.अभयसिंग देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली व सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.संदीप परदेशी यांचे आदेशान्वये पोलीस हवालदार योगेश मांडोळे,प्रताप मथुरे, गोरख चकोर,सुदर्शन घुले,राकेश काळे,संजय लाटे,दिपक महाजन यांना रवाना केले गोपनीय माहिती वरून संशयित सहा आरोपीना विचारपूससाठी ताब्यात घेण्यात आले होते.
विचारपुस दरम्यान रोहन उर्फ माऊली ज्ञानेश्र्वर पवार वय २३, राहुल रामदास मोरे वय २० दोन्ही रा पातोंडा ता.चाळीसगाव, सौरव संतोष मोरे वय २१ रा सांगवी ता.पाचोरा, दीपक प्रकाश सोनवणे वय १९, कपिल अशोक वाघ वय २७ दोन्ही रा पोहरे ता.चाळीसगाव, लक्ष्मण दशरथ माळी वय २२ रा डामरून ता.चाळीसगाव, यांनी गुन्हा कबूल करत बकऱ्या चोरी करून विकल्याबाबत सांगितले.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री.गोपाळ पाटील हे करीत आहे पुढील तपासात यापूर्वी बहाळ, कळमडू, बोरखेडा, वडगाव लांबे येथील चोरीस गेलेल्या बकऱ्या निष्पन्न होऊ शकतात.