सुरक्षित दिवाळीसाठी जळगाव जिल्हा पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक यांनी नागरिकांना जाहीर आवाहन !!
सुरक्षित दिवाळीसाठी जळगाव जिल्हा पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक यांनी नागरिकांना जाहीर आवाहन !!

जळगाव, प्रतिनिधी: – उपसंपादक इमरान शेख
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! जळगाव जिल्हा पोलीस दलाचे जाहीर आवाहन !
दिवाळीचा सण चे पार्श्वभूमीवर, जळगाव जिल्हा पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक यांनी नागरिकांना सुरक्षित आणि आनंदमय वातावरणात सण साजरा करण्यासाठी महत्त्वपूर्ण सूचनांचे जाहीर आवाहन केले आहे. चोरी, घरफोडी, ऑनलाइन फसवणूक तसेच फटाक्यांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
दिवाळीचा सण सुरक्षित आणि आनंदात साजरा करण्यासाठी कृपया खालील सूचनांचे पालन करा:
फटाक्यांबाबतची खबरदारी फटाके फक्त परवानाधारक विक्रेत्यांकडून घ्या.मोकळ्या आणि सुरक्षित ठिकाणीच फोडा.लहान मुलांना तुमच्या देखरेखीखाली फटाके फोडू द्या.फटाके फोडताना सुती कपडे घाला.
शांतता क्षेत्रात (रुग्णालय, शाळा) फटाके फोडू नका.
चोरी, सोनसाखळी हिसकावणे व घरफोडी टाळण्यासाठी खबरदारी
बाहेरगावी जात असाल तर शेजाऱ्यांना व जवळच्या पोलीस स्टेशनला नक्की कळवा.
बाजारपेठेत व गर्दीच्या ठिकाणी आपले पाकीट, मोबाईल आणि मौल्यवान वस्तू सांभाळा. अनोळखी व्यक्तींपासून सावध रहा.
महिलांनी मौल्यवान दागिने घालून एकट्याने फिरणे टाळावे. दागिने दिसणार नाहीत, याची काळजी घ्यावी.
संशयास्पद दुचाकीस्वारांपासून सावध रहा, विशेषतः जे आपला चेहरा लपवतात किंवा ज्यांच्या गाडीला नंबर प्लेट नाही.
घर सोडताना दरवाजे-खिडक्या व्यवस्थित बंद करा. घराला मजबूत व अतिरिक्त कुलूप लावा.
अनोळखी फेरीवाले किंवा मदतनीस यांची संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय घरात प्रवेश देऊ नका.
शक्य असल्यास आपल्या घराच्या परिसरात CCTV कॅमेरे लावा व ते चालू असल्याची खात्री करा.
ऑनलाइन फसवणूक टाळा
‘मोफत बक्षीस’ किंवा ‘मोठ्या सवलती’च्या बनावट लिंक्सवर क्लिक करू नका.
आपला बँक OTP, CVV किंवा पिन कुणालाही शेअर करू नका.
वाहतुकीचे नियम पाळा
आपले वाहन फक्त पार्किंगच्या ठिकाणीच लावा. मद्यपान करून गाडी चालवू नका.
महत्त्वाचे संपर्क क्रमांक
पोलीस नियंत्रण कक्ष:- 112
अग्निशमन दल:- 101
रुग्णवाहिका:- 108
चला, ही दिवाळी जबाबदारीने आणि सुरक्षितपणे साजरी करूया!
आपला विश्वासू,
पोलीस अधीक्षक, जळगाव जिल्हा



