Breaking
ब्रेकिंग

भडगाव पोलिसांची धडाकेबाज कामगिरी ! सोलर कॉपर वायर चोरी प्रकरणी ९ आरोपी जेरबंद, लाखांचा मुद्देमाल जप्त…!

भडगाव पोलिसांची धडाकेबाज कामगिरी ! सोलर कॉपर वायर चोरी प्रकरणी ९ आरोपी जेरबंद, लाखांचा मुद्देमाल जप्त...!

1 0 4 5 9 4

भडगाव प्रतिनिधी :-हय्युम अली सैय्यद

भडगाव शहर – भडगाव पोलिस स्टेशन हद्दीत सोलर प्लांटमधून कॉपर वायर चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. दिनांक 13/07/2026 रात्री 11.00 ते 14/07/2026 सकाळी 5.00 च्या दरम्यान केलेल्या कारवाईत 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

अशी झाली कारवाई

भडगाव पोलिस स्टेशनचे पोउपनि सुशील सोनवणे हे गस्त घालत असताना 3 संशयित इसम ताब्यात मिळाले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी कबुली दिली की ते गोडगाव ता. भडगाव रोडलगत असलेल्या सोलर प्लांटमधील कॉपर केबल चोरी करीत होते. त्यांच्या माहितीनुसार पोलिसांनी पहाटे 3.30 वाजता घटनास्थळी सापळा लावून आणखी 6 आरोपींना ताब्यात घेतले.

अटक करण्यात आले आरोपी

1. जानकीराम भागवत मोरे वय-22

2. रवि सोमा भिल वय-22

3. सुका संजय भिल वय-19

4. अनिल अर्जुन भिल वय-27

5. शुभम सुरेश भोई वय-23

6. योगेश दिगंबर भिल वय-20

7. संजय नारायण सोनवणे

8. आदील शेख शफिक मणियार वय-48

9. जितू यशोनाथ पवार वय-20

सर्व राहणार इंदीरा नगर, शिरसोली ता.जि.जळगाव

जप्त मुद्देमाल 5,15,400 रुपये

पोलिसांनी आरोपींकडून 1,00,000 रुपये किमतीची 4000 मीटर सोलर कॉपर वायर, 800 रुपयांचे 2 लोखंडी कटर, 1,50,000 रुपयांचे 8 मोबाईल, 35,000 रुपयांची बजाज पल्टिना मोटरसायकल आणि 3,00,000 रुपये किमतीची मारुती स्विफ्ट डिझायर कार असा एकूण 5,15,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पुढील तपास

सदर गुन्ह्यात भडगाव येथील सिक्युरिटी गार्ड गोपाळ सुरेश पाटील यांच्या फिर्यादीवरून गु.रज.नं. 237/2026 बी.एन.एस. कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीत आरोपींनी जिल्ह्यातील इतर ठिकाणीही अशाच प्रकारच्या चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे. पुढील तपास पोहेकॉं/1999 गोवर्धन बोरसे हे करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश टाक यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 0 4 5 9 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे