एरंडोल तालुक्यात महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत संपन्न ; प्रांताधिकारी मनीष गायकवाड साहेब व तहसीलदार गोपाल पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली 2 प्रकरणात यशस्वी तडजोड…!
एरंडोल तालुक्यात महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत संपन्न ; प्रांताधिकारी मनीष गायकवाड साहेब व तहसीलदार गोपाल पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली 2 प्रकरणात यशस्वी तडजोड...!

सत्यकाम न्यूज नेटवर्क एरंडोल :-इमरान शेख उपसंपादक
एरंडोल शहरातील दि. 17 सप्टेंबर 2026 रोजी
शासनाच्या निर्देशानुसार आज दिनांक 17 सप्टेंबर 2026 रोजी एरंडोल तहसील कार्यालयात महात्मा जोतिराव फुले जनकल्याण योजना अंतर्गत महसूल लोक अदालतचे आयोजन करण्यात आले होते.
या लोक अदालतीचे अध्यक्षस्थान कर्तव्यदक्ष प्रांताधिकारी मा. श्री. मनीष गायकवाड साहेब आणि कार्यत्पर तहसीलदार मा. श्री. गोपाल पाटील साहेब यांनी भूषविले.
साहेबांच्या प्रयत्नांमुळे वादाला सामंजस्याची किनार
सकाळपासूनच दोन्ही साहेबांनी स्वतः प्रत्येक प्रकरणात लक्ष घालून दोन्ही पक्षकारांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. कायद्याच्या चौकटीत राहून वाद सामंजस्याने कसे मिटवता येतील, याबाबत त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या या जनहितवादी भूमिकेमुळेच अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले वाद मिटण्यास मदत झाली.
22 पैकी 2 प्रकरणात तडजोड
या लोक अदालतीसाठी एरंडोल तालुक्यातील शेतजमीन वाटप, वारस नोंद, फेरफार दुरुस्ती अशा एकूण 22 महसूल प्रकरणांचा समावेश करण्यात आला होता. यापैकी 2 प्रकरणांमध्ये यशस्वी तडजोड घडवून आणण्यात आली असून, त्या कुटुंबांना जागेवरच न्याय मिळाला आहे.
प्रांताधिकारी मनीष गायकवाड साहेब आणि तहसीलदार गोपाल पाटील साहेब यांच्या या पारदर्शक आणि लोकाभिमुख कामकाजाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
यावेळी सर्व मंडळ अधिकारी, तलाठी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोक अदालतीमुळे सर्वसामान्य जनतेचे वाद कोर्टाबाहेर जलदगतीने मिटतात. त्यामुळे नागरिकांनी आपली प्रलंबित महसूल प्रकरणे अशा लोक अदालतीत दाखल करावीत, असे आवाहन यावेळी प्रशासनाकडून करण्यात आले.



