कासोदा येथील रजा केबलचे मेव्हणे धुळे येथील शेख शकील कुटुंबीय सहा आज रात्री उमरा यात्रेसाठी रवाना…!
कासोदा येथील रजा केबलचे मेव्हणे धुळे येथील शेख शकील कुटुंबीय सहा आज रात्री उमरा यात्रेसाठी रवाना...!

इमरान शेख उपसंपादक
धुळे येथील शेख शकील, त्यांची पत्नी शाहीन बी व त्यांची आई शकील शेख मुसा हे आज दि ११ ऑगस्ट रोजी मक्का-मदीना उमरा यात्रेसाठी रवाना होणार आहेत.
कासोदा येथील प्रसिद्ध रजा केबल चे संचालक मुस्ताक शेख यांची बहीण व पावणे असल्याने संपूर्ण कासोदा परिसरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
तीनही जण आज रात्री 9.00 वाजता मुंबईतील सहारा एअरपोर्ट येथून विमानाने सौदी अरेबियासाठी रवाना होणार आहेत. प्रवासापूर्वी त्यांनी कुटुंबीय, नातेवाईक व मित्रांच्या भेटी घेऊन आशीर्वाद घेतले. मक्का-मदीना येथे जाऊन देश, राज्य आणि गावातील नागरिकांच्या सुख-शांतीसाठी व समृद्धीसाठी दुआ मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रजा केबल मुस्ताक शेख यांच्या कुटुंबीयांनीही त्यांना पवित्र यात्रेसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या. गावातील मान्यवरांनीही शेख कुटुंबीयांच्या सुखरूप प्रवासासाठी व उमरा यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
इमरान रियाजोद्दीन शेख. सत्यकाम न्यूज उपसंपादक तर्फे शेख शकील व त्याची आई व आमची बहीण यांना पवित्र यात्रेसाठी मनापासून शुभेच्छा
उमरा मुबारक 🌙



