Breaking
ब्रेकिंग

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया  सेवेचे  71 वर्ष हे ग्राहक हितार्थ अविरत समर्पित भावनेने केलेले कार्य अत्यन्त गौरावस्पद.डॉ अनिल देशमुख प्रांत सचिव…!

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया  सेवेचे  71 वर्ष हे ग्राहक हितार्थ अविरत समर्पित भावनेने केलेले कार्य अत्यन्त गौरावस्पद.डॉ अनिल देशमुख प्रांत सचिव...!

1 0 4 0 6 7

पाचोरा भडगाव प्रतिनिधी :-हय्युम अली सैय्यद

पाचोरा शहर येथील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया चे 71 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत अखिल भारतीय ग्राहक पंचायत तर्फे पाचोरा शाखेत यांनी बँकेने ग्राहक हितार्थ केलेल्या अविरत समर्पित सेवेचे भान ठेवत प्रांत सचिव डॉ अनिल देशमुख यांचे प्रमुख उपस्थितीत बँक व्यवस्थापक श्री प्रदीप जाधव यांचा डॉ अनिल देशमुख प्रांत सचिव व जिल्हा पालक जळगांव यांचे हस्ते गुलाब पुष्पगुछ व अखिल भारतीय ग्राहक पंचायत दैनंदिनी देत गौरव करण्यात आला.

या प्रसंगी उपव्यवस्थापक तेजश्री म्याडम, यांचा जिल्हा महिला प्रमुख सौं. निर्मला देशमुख यांचे हस्ते तर श्री राहुल जी पाटील,यांचा डॉ मुकेश नैनाव यांचे हस्ते तसेच चतुर्थ कर्मचारी प्रतिनिधी श्री आनंद रक्षे , श्री किरण, श्रीमती मंगला ताई जाधव यांचा व सुरक्षा गार्ड व कर्मचारी सेवा देणाऱ्या सर्वांचे गुलाब पुष्प देऊन ऋण व्यक्त करण्यात आलेत. या प्रसंगी जिल्हा महिला प्रमुख सौं निर्मला देशमुख, जिल्हा अन्न व सुरक्षा समिती प्रमुख श्री गिरीश दुसाने, परिवहन समिती प्रमुख श्री सुरेश जी तांबे, वैद्यकीय समिती प्रमुख डॉ मुकेश नैनाव, पाचोरा तालुका सचिव डॉ प्रशांत सांगळे, सहसचिव डॉ कुणाल पाटील, तालुका वैद्यकीय समिती चे डॉ भरत प्रजापत, डॉ. सिद्धांत तेली आदी मान्यवर पदाधिकारी यांचे उपस्तितीत सदरहू ऋणानिर्देश सोहळा संपन्न झाला.

या प्रसंगी डॉ अनिल देशमुख प्रांत सचिव अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र यांनी स्टेट बँकेचे सातत्यपूर्ण सेवेचा गौरवपूर्ण उल्लेख करीत सर्वसामान्य ग्राहक, पेन्शनर, शेतकरी,लाडकी बहीण, संजय गांधी निराधार योजना, शैक्षणिक, व्यावसायिक, घरकुल योजना कर्ज व एकंदरीत सर्वच शासकीय निमशासकीय योजनाचा लाभ प्रत्यक्ष लाभधारका पर्यंत पोहचवण्याचे महत्वापूर्ण कार्याचा उल्लेख करीत आज ही संपूर्ण बँकेचे पाचोरा शाखेचे नूतनीकरण करीत असताना आहे त्या परिस्तिथीत म्हतावपूर्ण कार्य अविरत सुरु याच ठिकाणी सुरु असले बद्दल समाधान व्यक्त केलेत.

नूतनीकरण नंतर सिनियर सिटीझन साठी स्वतंत्र काउंटर, कर्ज वितरण सेवेत तत्पर सेवा, एकंदरीत ग्राहक सेवेचा दर्जा अधिक उत्तम रित्या उंचावलेला दिसेल असे आश्वासन श्री प्रदीप जाधव व्यवस्थापक यांनी आपले मनोगतात व्यक्त करीत अखिल भारतीय ग्राहक पंचायत बद्दल मनःपूर्वक धन्यवाद व्यक्त केलेत.

या प्रसंगी श्री सुरेश तांबे यांची विवेक वर्धनी नागरी पतसंस्थे वर संचालक पदी स्तुत्य निवड झाले बद्दल व वर उल्लेखीत सर्व डॉक्टर्स यांचा डॉ. डे निमित्य स्टेट बँक ऑफ इंडिया व अखिल भारतीय ग्राहक पंचायत तर्फे गुलाबपुष्प व दैनंदिनी सप्रेम भेट देत मान्यवरांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.श्री गिरीश दुसाने यांनी सूत्रसंचालन तर डॉ भरत प्रजापत यांनी आभार व्यक्त केलेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 0 4 0 6 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे