कासोदा शहरातील जुन्या वादातून दोन गटांत राडा, दोन्ही बाजूंनी १३ जणांवर गुन्हा दाखल…!
कासोदा शहरातील जुन्या वादातून दोन गटांत राडा, दोन्ही बाजूंनी १३ जणांवर गुन्हा दाखल...!

कासोदा शहरातील रात्री टी.टी.एस. चौक व गरीब नवाज चौक भागात आर्थिक व्यवहार आणि जुन्या वैमनस्यातून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूंच्या फिर्यादीवरून परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून १३ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,
कासोदा पोलीस स्टेशन हद्दीत कासोदा शहरात दिनांक 11/04/2026 रोजी रात्री टी.टी.एस. चौक व गरीब नवाज चौक परिसरात मारहाण व नुकसान प्रकरणी परस्पर संबंधित दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
१)प्रथम घटनेत, फिर्यादी शोएब मुन्सफखान (वय 26 वर्ष व्यवसाय केटरिंगकाम रा. गाझीचोक, जिन झोपडपट्टी कासोदा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पूर्वीच्या आर्थिक व्यवहारावरून सुरू असलेल्या वादातून आरोपी हसिनखान जमशेरखान याने फिर्यादीस फोन करून बोलावले. त्यानुसार फिर्यादी रात्री सुमारे 09.30 वाजता टी.टी.एस. चौकात जात असताना आरोपी 1. हसिनखान जमशेरखान 2. हकीमखान उर्फ काल्या जमशेरखान 3. शाहरुखखान जमशेरखान 4. सलमानखान जमशेरखान 5. मोसिमखान जमशेरखान 6. गुलरेजखान शाव खाँ 7. जमशेरखान शाव खाँ सर्व रा. गरीब नवाज चौक, कासोदा अश्या आरोपीनी एकत्र येऊन त्याला अडवून शिवीगाळ केली व “आज तुला संपवतो अशी धमकी देत लोखंडी रॉड व काठ्यांनी मारहाण केली, या घटनेत फिर्यादीच्या हात व डोक्याला दुखापत झाली आहे. तसेच त्याच रात्री सुमारे 11.00 वाजण्याच्या सुमारास दुसऱ्या घटनेत फिर्यादीचा भाऊ शाकिब मुनाफखान यास आरोपी हकीमखान उर्फ काल्या जमशेरखान व त्याच्या साथीदारांनी अडवून काठ्यांनी व धारदार हत्याराने मारहाण केली. यात त्याच्या पाय व चेहऱ्यावर दुखापत झाली आहे.
२)दुसऱ्या घटनेत, फिर्यादी हसीन खान जमशेर खान (वय 33 वर्षे, व्यवसाय चादर विक्री, रा. कासोदा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक 11/04/2026 रोजी रात्री सुमारे 09.00 ते 10.00 वाजण्याच्या दरम्यान आरोपी 1. शोएब खान मुन्नाफ खान 2. इम्रान खान मुन्सफ खान 3. इरफान उर्फ इप्यु खान मुन्सफ खान 4. शाकीब खान मुन्सफ खान 5. आवेश खान सिध्दीक खान 6. मुन्सफ खान अलोयार खान सर्व रा. गाझी चौक, झोपडपट्टी कासोदा अश्या इसमांनी फिर्यादीच्या दुकानात प्रवेश करून पूर्वीच्या पैशांच्या व्यवहारावरून वाद घालत मारहाण करुन लोखंडी फायटरने फिर्यादीच्या तोंडावर, ओठावर, डोळ्यावर मारहाण करुन दुखापत केली व गळ्यातील चांदीची चैन जबरदस्तीने तोडून नुकसान केले तसेच जीव मारण्याची धमकी दिली.
दोन्ही घटनांमध्ये संबंध्ति आरोपीविरुद्ध कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोपीतांना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यांचा पुढील तपास कासोदा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि श्रीकांत पाटील व पोउनि धर्मराज करत आहे



