Breaking
ब्रेकिंग

बांभोरी येथे ‘एसटीडी ग्रुपचा राजा’ मंडळातर्फे रक्तदान शिबिर संपन्न; ३० रक्तदात्यांनी केले रक्तदान…!

बांभोरी येथे 'एसटीडी ग्रुपचा राजा' मंडळातर्फे रक्तदान शिबिर संपन्न; ३० रक्तदात्यांनी केले रक्तदान...!

1 1 2 7 7 6

सत्यकाम न्यूज नेटवर्क कासोदा :-इमरान शेख उपसंपादक

दि १८ सप्टेंबर रोजी कासोदा जवळील बांभोरी येथील श्रीकृष्ण नगर, पांडे नगर भागातील एसटीडी ग्रुपचा राजा गणपती मित्र मंडळा तर्फे सामाजिक उपक्रमांतर्गत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गणेशोत्सवाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या या शिबिराला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या शिबिरात एकूण ३० रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. यावेळी इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे मोलाचे सहकार्य लाभले.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कासोदा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि श्रीकांत पाटील सर , मनोज दादा पाटील, महसूल मंडळ अधिकारी पारधी भाऊसाहेब, लोकमतचे जेष्ठ पत्रकार प्रमोद आण्णा पाटील, माजी चेअरमन हिंमत आण्णा पाटील, माजी ग्रा.पं. सदस्य सुभाष रतन चौधरी, माजी सरपंच भास्करभाऊ चौधरी, शिवसेना तालुका अध्यक्ष रवी आण्णा चौधरी, उपसरपंच संदीप वाघ, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष राहुल चौधरी, सदस्य मयूरभाऊ पाटील, गोरख सोनवणे, वासुदेव पाटील, भारत चौधरी, पत्रकार यु.टी. महाजन सर, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. पृथ्वीराज वाघ, वाणी सर, प्रशांत पाटील, विजय पाटील, नानाभाऊ पाटील तरडीकर, माजी सरपंच संजय खंडू चौधरी, अजितराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

मंडळाचे अध्यक्ष लोकेश पाटील, उपाध्यक्ष चेतन चौधरी, तुषार धनगर, सागरभाऊ चौधरी, निलेश सूर्यवंशी, गणेश चौधरी, संजय चौधरी, बबलू चौधरी, सुमित होतोले, लोकेश चौधरी, भूषण चौधरी, दिपक पाटील, गोपाल चौधरी यांच्यासह सर्व सदस्यांनी या शिबिराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

सामाजिक उपक्रम राबविल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी मंडळाचे कौतुक केले आहे..

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 1 2 7 7 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे