Breaking
ब्रेकिंग

एरंडोल शहरात  डी.डी.एस.पी. महाविद्यालयात महिला सुरक्षा व कायदेविषयी ॲड. काजल पांडे यांचे प्रबोधन…!

एरंडोल शहरात  डी.डी.एस.पी. महाविद्यालयात महिला सुरक्षा व कायदेविषयी ॲड. काजल पांडे यांचे प्रबोधन...!

1 1 1 1 2 3

इमरान शेख उपसंपादक

एरंडोल :- प्रत्येक युवतीने स्वतःच्या सुरक्षेसाठी आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी कायद्याचे प्राथमिक ज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन विधीतज्ज्ञ ॲड. काजल पांडे यांनी केले.

येथील यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डी.डी.एस.पी. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सोमवारी युवती सभा मंचाच्या उद्घाटन प्रसंगी ‘महिला सुरक्षा आणि कायदे’ या विषयावर व्याख्यान झाले.

यावेळी ॲड.काजल पांडे यांनी भारतीय न्याय व्यवस्थेतील महिला सुरक्षेचे कायदे, मूलभूत हक्क, सायबर सुरक्षा आणि दैनंदिन जीवनातील कायदेशीर जागरूकतेचे महत्त्व दाखले व उदाहरणांसह सोप्या भाषेत समजावून सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. ए. जे. पाटील होते. त्यांनी संविधानात्मक मूल्ये आणि कायदेशीर साक्षरतेवर भर देत विद्यार्थिनींनी सक्षम व निर्भीड बनावे असे आवाहन केले. प्रास्ताविक युवती सभा सचिव डॉ. शर्मिला गाढे-चिकटे यांनी केले.

यावेळी १५० विद्यार्थिनी, उपप्राचार्य डॉ. अरविंद बडगुजर, डॉ. उमेश गवई, डॉ. सोपान साळुंखे व सर्व प्राध्यापक उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. मीना काळे यांनी केले तर आभार डॉ. सविता पाटील यांनी मानले.

1/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 1 1 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे