Breaking
ब्रेकिंग

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश!

1 0 5 3 7 2

एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे गरीब नवाज चौक आणि श्री महादेव मंदिर परिसरात आमदार मा. ॲड. अमोलदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भव्य पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला.

यावेळी आमदार मा. ॲड. अमोलदादा पाटील यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मुस्लिम बांधवांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. नव्याने प्रवेश करणाऱ्या सर्वांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी आमदार मा. ॲड. अमोलदादा पाटील म्हणाले की, “शिवसेना ही सर्वसामान्यांची, शेतकरी, कष्टकरी, युवक, महिला आणि समाजातील प्रत्येक घटकाच्या हक्कासाठी लढणारी संघटना आहे. कासोद्यातील हा उत्स्फूर्त पक्षप्रवेश विकासाच्या राजकारणावर जनतेने व्यक्त केलेला विश्वास आहे. जात, धर्म किंवा पंथ यापलीकडे जाऊन सर्व समाजघटकांना समान न्याय, विकास आणि सन्मान मिळावा, यासाठी आम्ही सातत्याने कार्य करत आहोत. मतदारसंघात झालेली विकासकामे ही जनतेच्या विश्वासाची खरी पावती आहेत. शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला योग्य सन्मान व जबाबदारी देत जनसेवेचे कार्य अधिक जोमाने पुढे नेले जाईल.”

या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, जि.प. माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वरनाना आमले, युवासेना जिल्हाप्रमुख प्रा. मनोजभाऊ पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुदामतात्या राक्षे, तालुकाप्रमुख रविभाऊ जाधव, पंचायत समिती माजी सभापती गबाजीआण्णा पाटील, जिल्हा दूध संघाचे संचालक दगडू चौधरी, अल्पसंख्यांक प्रमुख जावेदभाऊ मुजावर, कासोदा माजी सरपंच महेशबापू पांडे, सरपंच बंटीभाऊ चौधरी, माजी तालुकाप्रमुख बबलूदादा पाटील, युवासेना तालुकाप्रमुख कमलेश पाटील, एरंडोल नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष तथा युवासेना शहरप्रमुख कृष्णा ओतारी, एरंडोल शहरप्रमुख अतुल मराठे, कासोदा ग्रापंचायत माजी सदस्य मुश्रीफ पठाण बांभोरी ग्रामपंचायत सदस्य मयूर पाटील, संदीप मराठे, अमोल पवार, सोनू शेलार, भूषण शेलार यांच्यासह शिवसेना-युवासेनेचे पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य, शिवसैनिक आणि पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कासोद्यातील हा भव्य पक्षप्रवेश एरंडोल विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची वाढती ताकद आणि आमदार मा. ॲड. अमोलदादा पाटील यांच्या नेतृत्वावर जनतेचा दृढ होत असलेला विश्वास अधोरेखित करणारा ठरला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 0 5 3 7 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे