महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे आदर्श पत्रकार भाग्यश्री पाटील सन २०२५ विशेष सन्मान पुरस्काराने सन्मानित…!
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे आदर्श पत्रकार भाग्यश्री पाटील सन २०२५ विशेष सन्मान पुरस्काराने सन्मानित...!

पाचोरा, प्रतिनिधी :-
पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज चैनल उपसंपादिका भाग्यश्री राजीव पाटील यांना “आदर्श पत्रकार पुरस्कार” प्रदान करून सन्मानित करण्यात आले.पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, समाजहितासाठीचे योगदान तसेच संघटनात्मक वाढीसाठी केलेल्या वर्षांच्या सक्रिय कार्याची दखल घेऊन “सन २०२५ विशेष सन्मान पुरस्कार” प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने आयोजित उत्तर महाराष्ट्र पत्रकार संघ अधिवेशनात प्रदान करण्यात आला. या प्रसंगी भडगाव-पाचोरा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे आणि राज्य कार्याध्यक्ष निलेश सोमाणी यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुरस्कार स्वीकृतीनंतरआपला प्रतिसाद देताना भाग्यश्री पाटील
> “हा सन्मान केवळ माझ्या व्यक्तिगत कार्याचा नाही, तर माझ्या कुटुंबीयांचा आणि सर्व सहकाऱ्यांचा मिळून मिळालेला आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजहित साधण्यासाठी आणि अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन. तसेच पत्रकार संघाच्या प्रगतीसाठी मनापासून कार्य करत राहीन.”
या कार्यक्रमास संघाचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर रायसाकडा , प्रदेश सदस्य तथा उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष अबरार मिर्झा , उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष राकेश सुतार व विविध पदाधिकारी आणि पत्रकार उपस्थित होते. पुरस्कारप्राप्तीनंतर भाग्यश्री पाटील यांच्यावर राजकीय , सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.