
उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगाव:-तालुक्यातील तरवाडे ते खरजई रस्त्यावर दिनांक ११ फेब्रुवारी २०२५ मंगळवार रोजी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास वाळू वाहतूक करणारे MH 30 AB 5697 या क्रमांकाचे लाल रंगाचे महिंद्रा कंपनीचे 575, एक ट्रॅक्टर-एक ट्रॉली महसूल पथकाने तपासणी केली असता, या ट्रॅक्टर चालकाने वाळू चे चलन दाखवले पण महसूल पथकाने चलन क्रमांक(ETP) ऑनलाईन चेक केला असता त्या चलनाची मुदत संपली असल्याचे दिसून आले असता सदरील ट्रॅक्टर महसूल पथकाकडून जप्त करण्यात आले. या ट्रॉली मध्ये सुमारे एक ब्रास वाळू आढळून आली असता हे ट्रॅक्टर प्रशासकीय इमारत चाळीसगाव येथे जमा करुन पंचनामा रिपोर्ट तहसील कार्यालय येथे सादर केलेला आहे.
यांच्या पथकाने केली कारवाई
सदरील कारवाई महसूल पथकातील तलाठी हर्षवर्धन मोरे, तलाठी महेश गोरे, तलाठी सचिन हातोले, तलाठी घनश्याम बागुल, तलाठी विशाल सोनार, तलाठी निलेश पवार यांच्या पथकाने केली.