पाच हजारांची रंगेहात लाच स्वीकारताना एरंडोल तहसीलच्या गोदाम किपरसह मुकादम जळगाव एसीबीच्या जाळ्यात
उपसंपादक – कल्पेश महाले
जळगाव – अतिरीक्त दिलेल्या बारदानापोटी तडजोडीअंती पाच हजारांची लाच मागून ती स्वीकारताना एरंडोल तहसील कार्यालयातील शासकीय धान्य गोदाम व्यवस्थापक तथा अव्वल कारकून नंदकिशोर रघुनाथ वाघ वय ४७, रा.श्रीराम कॉलनी, बालाजी शाळेच्या मागे, एरंडोल व मुकादम हमजेखान महेमुदखान पठाण वय ३९, सैय्यद मोहल्ला मारवाडी गल्लीच्या मागे, एरंडोल यांना अटक करण्यात आली. जळगाव एसीबीच्या पथकाने विधानसभा निवडणुकीच्या धामधूमीत आज बुधवार दि. १३ नोव्हेंबर रोजी केलेल्या कारवाईनंतर लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
असे आहे लाच प्रकरण
जळगावातील ४७ वर्षीय तक्रारदार यांना शासकीय गोदामातून बारदान (रिकाम्या गोण्या) विकत घेण्याचे कंत्राट जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडून मिळाले आहे. नंदकिशोर वाघ हे शासकीय धान्य गोदाम, एरंडोलचे गोडावून कीपर आहेत व कंत्राटदार मुकादम पठाण यांनी ७०० अतिरिक्त बारदान तक्रारदाराला देत सात हजारांची लाच मागितली व लाच न दिल्यास तुझा कंत्राट रद्द करू व भविष्यात कंत्राट मिळू देणार नाहीत, असे सांगितल्यानंतर तक्रारदाराने जळगावात एसीबीकडे तक्रार नोंदवली. सुरुवातीला ७०००रु, ६०००, ५५५०रु. ची मागणी करून तडजोडअंती ५००० रु. ची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली. आणि पठाण याला ५००० रु ची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. लाच पडताळणीदरम्यान संशयीतांनी पाच हजारांची लाच स्वीकारण्याचे मान्य केले. त्या नंतर वाघ यांना अटक करण्यात आली. संशयीतांविरोधात एरंडोल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांच्या पथकाने केला सापळा यशस्वी
हा सापळा जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, पो.कॉ.राकेश दुसाने आदींच्या पथकाने यशस्वी केला.