लाडकूबाई विद्या मंदिर भडगाव येथे विद्यार्थी प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न…!
लाडकूबाई विद्या मंदिर भडगाव येथे विद्यार्थी प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न...!

भडगाव तालुका प्रतिनिधी:-हय्युम अली सैय्यद
भडगाव :-भडगाव शहरातील नामांकित शिक्षण संस्था लाडकूबाई विद्या मंदिर येथे नवीन शैक्षणिक वर्षाचा ‘विद्यार्थी प्रवेशोत्सव’ अत्यंत उत्साहात आणि आनंददायी वातावरणात संपन्न झाला.
पहिल्या दिवशी शाळेत दाखल झालेल्या इयत्ता पाचवीचे नवीन प्रविष्ट विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक पुष्पगुच्छ तसेच गोड पदार्थ देऊन त्यांचे विद्यालयात स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवातीला कार्यक्रमाच्या अध्यक्षा संस्थेच्या उपाध्यक्षा आदरणीय डॉ. पूनमताई प्रशांत पाटील, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य आदरणीय जाधव सर, विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती वैशाली ताई पाटील मॅडम, उपप्राचार्या श्रीमती सीमाताई सैंदाणे मॅडम, पर्यवेक्षक श्री आर बी आहेर सर, ज्युनिअर कॉलेजचे समन्वयक श्री एम पी पवार सर यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, नवीन शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि शाळेच्या शिस्तीची माहिती दिली.
प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने शाळा आंगण सुशोभित करण्यात आले होते.
सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत गोड खाऊ देऊन करण्यात आले. या आनंददायी आणि उत्साही वातावरणात विद्यार्थ्यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी आनंद व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री व्ही एस पाटील सर व आभार प्रदर्शन श्री गणेश पाटील सर यांनी केले यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



