कासोदा प्राथमिक आरोग्य केंद्र तर्फ डेंगु दिन निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन…!
कासोदा प्राथमिक आरोग्य केंद्र तर्फ डेंगु दिन निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन...!

राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत दर वर्षी १६ मे डेंगु दिन म्हणून साजरा करण्यात येतो.आहे
कासोदा प्राथमिक आरोग्य केंद्रा द्वारे “डेंगु दिन ” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.मा. जिल्हा हिवताप अधिकारी यांच्या आदेशानुसार हा कार्यक्रम राबविण्याचे ठरवले असता आरोग्य पर्यवेक्षक श्री. भंगाळे साहेब यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी वेळोवेळी पाठपुरवा घेतला. या वर्षी हिवताप विभागा द्वारे “डेंगु नियंत्रणासाठी लोक सहभाग साठवलेलया पाणी साठ्याची तपासणी करा ,स्वछता राखा आणी ती भांडी झाकून ठेवा.” या घोषवाक्याने सर्वांचे लक्ष वेधण्यात आले होते.यामध्ये विविध कार्यक्रम करुन डेंगु आजारा विषयी जनजागृति करण्यात आली. डेंगु आजार हा एडीस मादी डासामुळे उदभवणारा आजार आहे. हा डास स्वच्छ पाण्यामध्ये वाढतात या करिता हफ्त्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्यास ग्रामस्थाना सांगितले, पाण्याचे टाकी कंटेनर झाकून ठेवण्याचे महत्व पटवून दिले यामुळे डासांची उत्पत्ती रोखता येईल,जलद ताप रुग्ण सर्वेक्षण व आरोग्य शिक्षण इत्यादी कार्य करण्यात आले. श्री. मिलिंद गायकवाड (आरोग्य निरीक्षक)यांच्या मार्गदर्शनाखाली वरील विविध सर्वेक्षण व जनजागृति विविध गावांमधे करण्यात आली. याप्रसंगी डॉ. राजपूत मॅडम (वैद्यकीय अधिकारी) , श्री. गढरी (पी.ओ.), श्री राजेश पवार (एलएसओ)श्री. पी. रायगड़े आ. सहा.,ओ. पी. डी. ए.एन.एम. व इतर कर्मचारी यांनी देखील वेळोवेळी सहकार्य केले.तसेच कासोदा प्रा. आ.केंद्र अंतर्गत येणारे उपकेंद्रा द्वारे देखील विविध कार्यक्रम राबविण्यात आले.



